- ३५ गावकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून गावात लावली ३५ पाम ची झाडे
- सरपंच हरिदास झाडे यांचा वाढदिवसाप्रसंगी गावकऱ्यांची आगळीवेगळी भेट
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव तसेच ग्रामपंचायत खामोना-माथरा चे सरपंच हरिदास झाडे यांचा वाढदिवस गावकऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. सरपंचाच्या वाढदिवसप्रसंगी माथरा गावातील ३५ गावकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून गावात ३५ पाम ची झाडे लावत त्यांच्या संगोपनाची जवाबदारी सुद्धा घेतली.
वाढदिवसाचे औचित्य साधून सरपंच हरिदास झाडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गावात श्री गुरुदेव दत्त सांप्रदायिक मंडळ तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वह्या, पेन चे वाटप केले. गावातील जेष्ठ नागरिक तसेच युवक मुलांनी आपला सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. आपल्या नावाप्रमाणे झाडे लावा, झाडे जगवा या उपक्रमातून गावातील परिसरात झाडे लावण्यात आली. वाढदिवस कसा साजरा करावा याचे अतिशय सुंदर उदाहरण माथरा गावकऱ्यांनी करवून दिले. यावेळी उपसरपंच सौ. शारदा तलांडे, ग्रापं सदस्य अल्का वैद्य, सोनी ठक, मारोती शामराव चन्ने, वासुदेव लांडे, गोसाई वांढरे, दिवाकर चहारे, रामदास धोटे, रामकिसन गोखरे, शंकर लांडे, ज्ञानेश्वर बांदुरकर, बाळकृष्ण राखुंडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.
खामोना येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना सुद्धा वह्या, पेन चे वाटप करण्यात आले. यावेळी. उपसरपंच सौ. शारदा जगदीश तलांडे, ग्रापं सदस्य मारोती शामराव चन्ने, सौ. सोनी नवनाथ ठक, सौ. अल्का दिलीप वैद्य, तंटामुक्ती अध्यक्ष गजेंद्र मधुकर मोरे, ग्रामसेवक विनोद केवे, जिप शाळेचे मुख्याध्यापक धनवलकर सर व शिक्षकवृंद, आंगणवाडी मदतनीस, वासुदेव लोणारे, दिलीप गिरसावळे, दिलीप वैद्य, नामदेव लोणारे, नवनाथ मिलमिले, साईनाथ लोणारे, संजय बुटले व गावातील नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.