- नवाब मलिकांना अटक केल्याचा निषेधार्थ महाविकास आघाडीने केले आंदोलन
- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
- बघा व्हिडीओ - काय म्हणाले आंदोलनकर्ते
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गड़चांदूर -
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने बुधवारी अटक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.
राकाँचे विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे यांच्या अध्यक्षतेखाली महविकास आघाडी कोरपनाच्या वतीने भाजपा सरकारने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी अटक केल्याच्या निषेध करण्यात आले. न. प. अध्यक्षा सविता टेकाम, विक्रम येरने, राकाँचे अरुण निमजे, शरद जोगी, शिवसेनेचे सागरभाऊ ठाकुरवार, राजू कादरी यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला माल्यार्पण करून मुख्य चौरस्त्यावर केंद्र शासनाच्या ईडी व सीबीआयच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करत विरोध प्रदर्शन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी तथा केंद्र सरकार ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर करुन देशात चुकीचा पायंडा पाडत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. केंद्रातील भाजपा सरकार मनमानी कारभार व हुकूमशाही पध्दतीने, सूडबुध्दीने ईडीचा गैरवापर करीत आहे असा मोठा आरोप राकाँचे अरुण निमजे यांनी केला आहे.
जनविकास आघाडी कोरपना यांच्या नेतृत्वात झालेल्या विरोध प्रदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, नगराध्यक्ष सविता टेकाम,न. प. उपाध्यक्ष शरद जोगी, गटनेता विक्रम येरने,
संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष उमेश राजूरकर, युवक काँग्रेस अध्यक्ष रुपेश चुधरी, माजी शहर अध्यक्ष रोहित शिंगाडे, ज्येष्ठ नेते पपया पोंनमवार, सभापती अरविंद मेश्राम, सभापति सौ. अश्विनी कांबळे, सौ. कल्पना निमजे, सौ. किरण अहिरकर, सुनील अलगिवार, प्रवीण काकडे, चंद्रमुनी उमरे, साईनाथ सोनटक्के, गणेश आडे, मनीष सलाम, श्रीकांत धर्मापुरी आदी पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.