Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ना.नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन राजुरा भाजपाचा इशारा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ना.नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन राजुरा भाजपाचा इशारा राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने, निषेध व तहसीलदारांना दिले निवेदन ...
  • ना.नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन
  • राजुरा भाजपाचा इशारा
  • राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने, निषेध व तहसीलदारांना दिले निवेदन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप लागत आहे. बुधवारी असाच एक आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने चौकशीअंती लावून ना. मलिक यांना अटक केली आहे. तरी त्यांना मंत्रीपदावर कायम ठेवून सरकार पाठराखण करीत आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना तहसीलदार राजुरा यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारने ना.नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला.
निषेध आंदोलनात व निवेदन देते वेळी भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष वाघुजी गेडाम, अरूण मस्की, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, वेकोलि प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारे अँड. इंजि. प्रशांत घरोटे, नगरसेवक राजु डोहे, खामोनाचे सरपंच हरिदास झाडे, दिलीप वांढरे, संजय पावडे, जनार्धन निकोडे, विलास खिरवटकर, शंकर नळे, पराग दातारकर, कैलास कार्लेकर, दीपक झाडे तसेच अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top