मनसे महिला सेना शहर उपाध्यक्ष वाणीताई सदालावार यांनी महाकाली कॉलरी सीसीएम यांना दिले निवेदन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
महाकाली कॉलरीतील कॅन्टींग चौक ते कपिल चौक बायपास रोड व एलसीएच मायनस बी टाईप, ए टाईप क्वार्टर्स पर्यंत बऱ्याच वर्षांपूर्वी डांबरीकरण रोड बनविण्यात आले होते. मात्र आता त्या रोडवर जागो जागी खडडे पडले असुन त्या पडलेल्या खडयामुळे या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या लोकांना जा-ये त्रास सहन करावा लागत आहे. वाहन चालवताना खड्डे वाचविण्याकरिता जीवावरची कसरत लोकांना करावी लागत आहे. खड्डे वाचविण्याचा नादात अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठा अपघात घडून लोकांना इजा होईल याअगोदरच संबंधित विभागाने याची दखल घेत संपूर्ण रोडचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच या परिसरात स्ट्रीट लाईट पूर्णपणे बंद झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. बंद पडलेले स्ट्रीट लाईट हि यासोबतच करण्याचे निवेदन महाकाली कॉलरी सीसीएम यांना देण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, राहुल बालमवार, मनसे जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगूलवार, जिल्हा उपाध्यक्ष शोभा वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, क्रिष्णा गुप्ता, मनोज तांबेकर, सचिन भाळस्कर, शंकर भडके, राजु येरले, अनुरोज रायपुरे, राजु देवानगन, वर्षा भोंगळे, प्रमोद मेश्राम व मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. समस्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा मनसे महिला शहर उपाध्यक्ष वानी सदालावार यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.