Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिव जयंती नाचून नाहीतर वाचून साजरी करा - आकाश कडुकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिव जयंती नाचून नाहीतर वाचून साजरी करा - आकाश कडुकर छावा फाउंडेशन राजुरा तसेच श्री संत नागजी ज्ञान प्रासारक मंडळ राजुरा यांच्या संयुक्त विद्...
  • शिव जयंती नाचून नाहीतर वाचून साजरी करा - आकाश कडुकर
  • छावा फाउंडेशन राजुरा तसेच श्री संत नागजी ज्ञान प्रासारक मंडळ राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा-
देशपांडे वाडी येथील संत नागजी महाराज मंदिर सभागृहात छावा फाउंडेशन राजुरा तसेच श्री संत नागजी ज्ञान प्रासारक मंडळ राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी म्हणून आकाश कडुकर यांनी मार्गदर्शन करताना श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणी ला उजाळा देत शिव जयंती नाचून नाहीतर वाचून साजरी करावी आणि शिवरायांच्या विचाराचा आपल्या जीवनात अमल करावे असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिप सदस्य तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, पाहुणे म्हणून सतिश धोटे, माजी नगरसेवक गजानन भटारकर, ओमप्रकाश गेडाम, अरूण जमदाडे, बादल बेलेमा, नेफाडो जिल्हाध्यक्ष संतोष देरकर, शिवसेनेचे माजी शहर अध्यक्ष भुमन सल्लम, सामाजिक कार्यकर्ता बबलू चव्हाण, वंदना वाटेकर, वैशाली सुर्वे उपस्थित होते. 
छावा फाउंडेशन चे अध्यक्ष आशिष करमरकर यांनी प्रास्ताविक संचालन शुभांगी वाटेकर यांनी  केले. कार्यक्रमाची सांगता आकाश वाटेकरांच्या आभार प्रदर्शनाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संदिप पोगला, रणजित उगे, देवकिशन वनकर, अमोल राऊत, रखिब शेख, भुषण रागिट, विकास वाटेकर, निखिल कावळे, सुचित कावळे, प्रफुल्ल बोबडे, कुणाल पिपळशेंडें, रोशन मावलीकर, श्री संत नगाजी ज्ञान प्रसारक मंडळाचे भास्कर यसेकर, प्रदिप वाटेकर, भास्कर वाटेकर, देवा राजुरकर, नंदु आंबेकर, चेतन सातपुते यांनी सहकार्य केले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top