Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पिंपळगाव येथे दोन दिवसीय शिवजयंती महोत्सव साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पिंपळगाव येथे दोन दिवसीय शिवजयंती महोत्सव साजरा धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - संघर्ष युवा मंच, जिजाऊ सखी मंच तथा समस्त...
  • पिंपळगाव येथे दोन दिवसीय शिवजयंती महोत्सव साजरा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
संघर्ष युवा मंच, जिजाऊ सखी मंच तथा समस्त ग्रामवासी पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्द्यमाने दोन दिवसयीय शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजकुमार पानघाटे, विशेष उपस्थिती पोलीस पाटील प्रशांत नागपुरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबुजा फाउंडेशनचे अधिकारी कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी गावातील महिला प्रवर्गासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजनात गावातील महिला मोठा प्रमाणात सहभागी झाल्या. सायंकाळी प्रा. दिलिप चौधरी यांचे शिवचरित्र वर जाहिर व्याख्यान झाले. १९ फ्रेब्रुवारी ला दुपारी ३ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि रात्री सांस्कृतीक स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक शिवाजी मालेकर, जिप शाळेचे शिक्षक गुणवंत खोब्रागडे हे होते. 
मागील तीन वर्षापासुन पिंपळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. गावातील तरुण-तरुणी व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत संघर्ष युवा मंच तथा जिजाऊ सखी मंच याच्या सहभागातुन शिवजयंती मोठ्या उत्सवात पार पडली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top