Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ढोल-ताशांच्या गजरात नांदा येथील शिवजयंती उत्साहात साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ढोल-ताशांच्या गजरात नांदा येथील शिवजयंती उत्साहात साजरी शिव साम्राज्य युवक मंडळाच्या वतीने  कार्यक्रमाचे आयोजन  भव्य रॅली सोबतच विविध स्पर्ध...
  • ढोल-ताशांच्या गजरात नांदा येथील शिवजयंती उत्साहात साजरी
  • शिव साम्राज्य युवक मंडळाच्या वतीने  कार्यक्रमाचे आयोजन 
  • भव्य रॅली सोबतच विविध स्पर्धांचे आयोजन
  • शिव जयंतीच्या निमि्ताने मोफत ई-श्रम कार्ड रजिस्ट्रेशन सुरू
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत नांदा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती मोठय़ा उत्साहात  साजरी करण्यात आली. याप्रसंगी नांदा येथील शिव साम्राज्य युवक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे वीर मराठा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी गावातील नागरिकांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. प्रसंगी "शिवाजी महाराज की जय" घोषणाही देण्यात आल्या.
सकाळच्या दरम्यान दिंडी काढून पूर्ण गावात फेरी काढण्यात आली. ढोल-ताशाचा गजर अंगणा अंगणा मध्ये छत्रपती विषयक रांगोळ्या छत्रपतींच्या विविधांगी वेशभूषा, छत्रपतींचा जयघोष आणि स्पर्धा युक्त दिंडी अशा विविध कार्य्रमांचे नांदा येथील तुकडोजी महाराज चौकामध्ये शिवजयंती मोठ्या थाटामाटात मध्ये संपन्न झाली. 
रात्री घेतलेल्या कार्यक्रमात जवळ पास परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पथनाट्य, सामूहिक नृत्य आणि गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदा गावच्या पोलीस पाटील सौ. वैशालीताई भोयर उपस्थित होत्या. यांनी  आपल्या लहानग्या बाळाला चक्क शिवाजीचा वेश धारण करून मंचावर उपस्थित झाल्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की प्रत्येक मातेला असे वाटते की शिवाजी महाराज हा शेजार्‍याच्या घरी नाही तर आपल्याच घरी जन्मास यावा. राज्यामध्ये घडत असलेल्या घडामोडीचा आम जनतेवर होणारा परिणाम याचा सर्वस्वी लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर येथील प्लास्टिक सर्जन डॉक्टर रुपेश ठाकरे उपस्थित होते. आपल्या दीर्घकालीन मार्गदर्शनातून आजच्या समाजाची गत आणि असलेली शिवाजी महाराजांची अत्याधिक आवश्यकता, समाजातील अनिष्ट रूढी प्रथा, चालीरीती परंपरा याच्यावरती प्रखर मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून नांदा बाखर्डी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य शिवचंद्र काळे, कोरपना पंचायत समितीचे माजी सभापती संजय मुसळे, पंचायत समिती उपसभापती शामसुंदर राऊत, प्राचार्य डॉ. अनिल मुसळे,  उत्कृष्ट शेतकरी अंकुश धाबेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामदास पानघाटे, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप, पुरुषोत्तम निब्रड, पंचायत सदस्य अभय मुनोत, मुरलीधर बोडके व विशेष अतिथी म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, रामकृष्ण रोगे, गोविंद गुप्ता, प्रमोद वाघाडे,  प्रकाश बोरकर, संजय खिरटकर, शिव साम्राज्य युवक मंडळ, नांदाचे अध्यक्ष हेमंत वाटेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमार आदित्य बोडके, कुमारी सानिया शेख यांनी आपल्या विशिष्ट शैलीत केले. याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग छटा सादर करण्यात आल्या. गावातून ढोल-ताशांच्या गजरामध्ये आली महिलांसाठी समय व रांगोळी स्पर्धेचे आयोजन मंडळाच्यावतीने करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण गाव विविधा रंगी रांगोळ्यांनी सजलेला दिसून येत होता. विद्यार्थ्यांची सामूहिक नृत्य, सामूहिक गीत स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण  मानपत्र देऊन मंडळाच्यावतीने करण्यात आले. आभार संकेत खोके यांनी मानले. शिवजयंती उत्सव कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिवजयंती उत्सव समितीचे आकाश बोडखे मंगेश बोडखे, आशिष  उरकुडे, आदित्य  खोरे, निखिल ठोंबरे - नितेश  लोहबडे, बृषभ  पानघाटे, कुणाल  आंबिलकर, आदित्य  बोडखे, हर्षल खोके, रोशन खोके, किशोर अवधाने, मोहल कामठकर सोबतच सर्व सदस्य व गावातील तरुण मित्र परिवारांनी अथक परिश्रम घेतले.
शिव जयंतीच्या निमि्ताने शिव साम्राज्य युवक मंडळाकडून  मागिल 10 दिवसा पासुन ई- श्रम कार्ड मोफत रजिस्तेशन चालू आहे. जास्तीत जास्त नागरिकानी या योजनेचा लाभ घेण्याचा आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top