Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ट्रॅव्हल्स, कंटेनर, कारचा भीषण अपघात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ट्रॅव्हल्स, कंटेनर, कारचा भीषण अपघात चंद्रपुर-नागपुर महामार्गावर पिंपळगाव फाटा जवळील घटना आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - नागपूर-च...
  • ट्रॅव्हल्स, कंटेनर, कारचा भीषण अपघात
  • चंद्रपुर-नागपुर महामार्गावर पिंपळगाव फाटा जवळील घटना
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वरोरा तालुक्यातील पिंपळगाव फाट्याजवळ DNR ट्रॅव्हल्स, छोटा कंटेनर व कार यांच्यात झालेल्या अपघातात 3 जण जख्मी झाले आहे. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. ही घटना आज सकाळी 10 ते 11 वाजताच्या सुमारास घडली. 
मिळालेल्या माहिती नुसार चंद्रपूर वरून कार क्रमांक MH-40-A-8505 ही नागपूरच्या दिशेने जात असताना महामार्गावरील वरोरा तालुक्यात येणाऱ्या पिंपळगाव फाट्या जवळ अचानक कार अनियंत्रित झाली व दुभाजक ओलांडून नागपूर-चंद्रपूर महामार्गावर आली. त्याच वेळी छोटा कंटेनर नागपूर वरून चंद्रपूरच्या दिशेने जात असताना कारला वाचविण्यासाठी कंटेनर चालकाने ब्रेक मारले व महामार्गावररुन खाली उतरत गेला तरी ही कारला धडक बसून ती पलटी झाली. कंटेनर चालकाने ब्रेक मारल्याने त्यामागून येणाऱ्या ट्रॉव्हेल्स चालकाने ही अपघात टाळण्यासाठी ब्रेक मारल्याने ती सुद्धा अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला होऊन अपघातग्रस्त झाली. कार चालकाला वाचविताना घडलेल्या या अपघातात कार मधील 3 जण जख्मी झाले. सुदैवाने दुर्घटनेत जिवीतहानी झाली नाही.
दुर्घटनेची माहिती मिळताच लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जख्मींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात जखमींवर उपचार करून त्यांना रेफर करण्यात आले असल्याचे कळते. जखमींमध्ये प्रियंका तोडासे, निशा कोरडे, सुनील गोवारदिपे यांचा समावेश आहे. अधिक तपास वरोरा पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top