वाचा कोणत्या चुकीमुळे झाली घटना
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नवी दिल्ली -
रात्री फोन चार्जिंगला लावून झोपण्याची सवय अनेकांना असते. रात्री फोन चार्जिंगला लावून सकाळपर्यंत तो तसाच चार्ज होत राहतो. परंतु ही सवय जीवावरही बेतू शकते. नुकतीच अशी एक घटना समोर आली असून एका महिलेचा यात मृत्यू झाला असून दोन मुलं गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये ही दुर्घटना घडली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. रात्री महिला आपल्या दोन मुलांसह खाटेवर झोपून मोबाइल पाहत होती.
मोबाइल पाहताना महिलेने मोबाइल चार्जिंग प्लगमध्ये लावला होता. त्यानंतर मोबाइल तसाच चार्जिंगला ठेवून ती झोपली. पण मध्यरात्री मोबाइल किंवा चार्जरमध्ये करंट आल्याने मोठा ब्लॉस्ट झाला. महिला आणि तिची दोन मुलं या करंटमध्ये आल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. करंट लागल्याने महिला आणि दोन्ही मुलं ओरडू लागली. त्यांचा आवाज ऐकून महिलेचा पती बाहेर आला, त्यावेळी पत्नी आणि मुलं बेशुद्ध अवस्थेत आढळले. तिघांनाही रात्री प्राथमिक स्वास्थ केंद्रात नेण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. तर दोन पाच आणि आठ वर्षांच्या मुलांवर उपचार सुरू आहेत.
मोबाइल कधीही रात्रभर चार्जिंगसाठी ठेवू नका. यामुळे मोबाइलची बॅटरी खराब होऊ शकते. मोबाइलच्या अधिकच्या वापरामुळे अनेकांना सतत मोबाइल चार्ज करावा लागतो. त्यामुळे अनेक जणांना मोबाइल रात्रभर चार्जला ठेवून सकाळी संपूर्ण चार्ज झालेला फोन वापरायची सवय असते. परंतु रात्रभर चार्ज केल्याने ओव्हर चार्जमुळेही मोबाइल ब्लास्ट होतो. रात्रभर चार्जिंगमुळे मोबाइल ब्लास्ट होण्याचा धोका निर्माण होतो. ओव्हर चार्जिंग फोनसाठी धोकादायक ठरतं. यामुळे बॅटरी लाइफ कमी होतं. तसंच फोनवरही याचा परिणाम होतो.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.