Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: कोरपना नगर पंचायततीत झाली सभापतींची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना नगर पंचायततीत झाली सभापतींची निवड चारही सभापती पद बहुमत प्राप्त असलेल्या काँग्रेसकडेच धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना...
  • कोरपना नगर पंचायततीत झाली सभापतींची निवड
  • चारही सभापती पद बहुमत प्राप्त असलेल्या काँग्रेसकडेच
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
नगरपंचायत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आज नगर पंचायत मधे सभापतींची निवड करण्यात आली. तहसीलदार महेंद्र वाकलेकर आणि नप मुख्याधिकारी विशाखा शेरकी यांच्या उपस्थितीत कोरपना येथील नगर पंचायत सभापतीची निवड करण्यात आली. यात चारही सभापती बहुमत प्राप्त असलेल्या काँग्रेस पक्षातील सदस्यांची निवड झाली.
आज दुपारी तीन वाजता नगरपंचायत कोरपना येथील सभापतींची निवड करण्यात आली. यात मनोहर बळीराम चन्ने यांची बांधकाम सभापती, लक्ष्मण खुशालराव पंधरे यांची आरोग्य व शिक्षण सभापती, सौ. मनीषा प्रशांत लोंडे यांची महिला व बालकल्याण सभापती, नपं मधे उपाध्यक्ष असलेले इस्माईल रसूल शेख यांची पाणीपुरवठा सभापती म्हणून निवड करण्यात आली. सौ. आरिफा बेगम रमजान शेख यांची नगर पंचायत कोरपना येथे महिला व बालकल्याण उप सभापती पदी निवड करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेला तहसीलदार महेंद्र वाकलेकर, मुख्याधिकारी विशाखा शेरकी, नपं अध्यक्ष सौ. नंदा विजय बावणे, काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय बावणे, नितीन बावणे, नपं सदस्या सोबत नगर पंचायत सदस्या सोबतच रवि माजरे, नितीन भोयर, माने मॅडम सह इतर नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top