विरेंद पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथीलराष्ट्रीय सेवा योजना पथक व भौतिकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त शिवरायांचे विविध पैलू उलगडत असतांनाच त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये, येणाऱ्या भावी पिढीमध्ये शिवरायांचे विचार पोहचुन शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेले असामान्य कार्य माहिती होईल, व महापुरुषांचे स्मरण होईल यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन करण्यात आले. या व्याख्यानास प्रमुख वक्ते म्हणून दिलीप सोळंके, विचारवंत तथा प्रसिद्ध वक्ते, उपस्थित होते.
सोळंके यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपतींच्या संपूर्ण जीवनकार्याचा लेखाजोखा मांडला. शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची माहिती त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिली. या व्याख्यानास अध्यक्ष म्हणून आ. शि. प्र. म.चे ज्येष्ठ संचालक श्री दत्तात्रयजी येगीनवार, उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये आ. शि. प्र. म. चे सचिव मा. अविनाश जाधव, संचालक तथा माजी आमदार ऍड. संजय धोटे, संचालक तथा माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे, संचालक साजिद हुसेन बियाबानी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.वारकड, उपप्राचार्य डॉ आर. आर. खेरानी, शिवाजी शाळेचे मुख्याध्यापक श्री डांगे उपस्थित होते, संचालन डॉ. खेरानी यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड व आभार डॉ विशाल दुधे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.