- शिवजयंती निमित्य मातीचे गड - किल्ले निर्मिती स्पर्धा संपन्न
- छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान देखरेख समिती बामणवाडा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा संयुक्त उपक्रम
विरेंद पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
ग्राम पंचायत बामणवाडा, छ. शिवाजी महाराज बालोड्यान देखरेख समिती, बामणवाडा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव तक्षशिला नगर, बामणवाडा येथील बालोद्यानात साजरा करण्यात आला.
सकाळी मातीचे किल्ले निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विविध शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी झाले. यास्पर्धेत प्रथम क्रमांक सानवी सचिन मोरे, द्वितीय सुजल संजय काकडे, तृतीय दुर्वा बादल बेले यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. प्रोत्साहनपर आरुष धनराज उपासे, धनश्री चंद्रशेखर कुरेकर यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले. तर सहभागी सर्वांनां संस्थेच्या वतीने प्रमानपत्र वितरित करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण किशोर कवठे व अल्पना दुधे यांनी केले. यावेळी बामणवाडा ग्रामपंचायतच्या सरपंच भारती पाल यांनी स्पर्धेला भेट देऊन विध्यार्थीचे कौतुक व अभिनंदन केले.
सायंकाळी शिवाजी महाराजाँच्या जीवनचरित्रवर व्याख्यान व गड - किल्ले निर्मिती स्पर्धेचे बक्षीस वितरण घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संजय निखाडे व डॉ. सारिका साबळे-जाधव यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी सर्वानंद वाघमारे माजी सरपंच तथा सदस्य ग्रा.पं. बामणवाडा व बालोद्यान समितीचे प्रमुख, अविनाश टेकाम, उपसरपंच, ग्रा. पं. बामणवाडा, बादल एन. बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो, दत्ता कौठाळकर, ग्रामसेवक ग्रा.पं. बामणवाडा, विजयकुमार जांभुळकर, नागपूर विभाग अध्यक्ष नेफडो, संतोष देरकर,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, नेफडो, रजनी शर्मा, चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष,राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती, ग्राम पंचायतच्या सदस्या संमिश्रा झाडे सुजाता मेश्राम, तसेच कविता उपरे, केवराम डांगे, मुख्याध्यापक, शिवाजी हायस्कूल राजुरा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी हायस्कुल च्या विध्यार्थीनि वैभवी भेंडे, माही चल्लावार, तनु पिंपळकर, पौर्णिमा झाडे, पूर्वा चिडे यांनी "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" ही नाटिका सादर केली. संजय निखाडे व डॉ. सारिका साबळे - जाधव यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत आधुनिक काळामध्ये विद्यार्थी तसेच नागरिकांना शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाची ओळख करून देणे गरजेचे आहे. तसेच शिवाजी महाराजाचे बालपण, संघटन चातूर्य, सर्वधर्म समभाव, स्त्रियांप्रति आदर, शेतकरी धोरण, आरमार, युद्ध कौशल्य, गनिमी कावा, मित्रत्व, गड -किल्ले निर्मिती कौशल्य, पर्यावरण प्रेम, आदींवर सविस्तरपणे मार्गदर्शन केले. तसेच बालोद्यान समिती मार्फत येथील जेष्ठ नागरिक शंकर करमरकर यांच्या लग्नाचा वाढदिवस केक कापून व शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज उपरे यांनी केले. तर प्रास्ताविक विवेक बक्षी यांनी व आभार प्रदर्शन भारत फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रामपंचायत बामनवाडा, छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान देखरेख समिती बामनवाडा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सभासदांनी अथक परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.