Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शिवचरित्र परिचयाने पोदार स्कूल बल्लारपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवचरित्र परिचयाने पोदार स्कूल बल्लारपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - अखंड स्वराज्य...

  • शिवचरित्र परिचयाने पोदार स्कूल बल्लारपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
अखंड स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचे कुलदैवत राजा शिवछत्रपती यांच्या जन्मोत्सवानिमित्त पोदार इंटरनॅशनल स्कूल बल्लारपूर येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र पठाणाने शिवजयंतीचा कार्यक्रम दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी शालेय परिसरात विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक डॉ. राकेश रंजन व मुख्याध्यापिका सौ. रुबीना शेख यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच शिवाजी महाराजांचे रूप साकारणारा पेहराव धारण केलेला इयत्ता 5 चा विद्यार्थी शौर्य सिंग याला तिलक लावून करण्यात आली. छत्रपती यांच्या जीवनावर आधारित माहितीचे पठण वर्ग 5 वीच्या विद्यार्थी हसनैन शेख यांनी केले तर 2 ऱ्या वर्गाची विद्यार्थिनी कु. मुग्धा वाटेकर हिने प्रार्थना म्हंटली, वर्ग 3 ची विद्यार्थिनी कु.आराध्या चांदोरे हिने सुविचार सांगितले त्यानंतर शब्दाचे महत्त्व वर्ग 5 ची विद्यार्थिनी कुमारी श्रीजा हिने पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक यांनी शिवचरित्रात नमूद दृढनिश्चय व आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे असे उद्गार काढले.  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका चैताली राव यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा क्रीडाशिक्षक मयुर खेरकर यांनी आखली होती तर कार्यक्रम पूर्ण करण्यास वरिष्ठ लिपिक प्रेम मांझी व इतर कर्मचारी मनोज भोयर, प्रणील जिवतोडे व विवेक सत्रे यांनी सहकार्य केले त्यावेळेस शाळा प्रशासन व्यवस्थापक शरद करोले, शाळेतील सर्व विद्यार्थी व इतर सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top