विरेंद पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
ढोल ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध…... छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी कोहपरा येथे शिवजयंती निमित्य भजनाच्या गजरात बैलबंडी द्वारे भव्य मिरवणूक काढण्यात आली.
शिव छत्रपती मराठा मंडळ कोहपरा तर्फे शिव जन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर शिव जन्मोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकृष्ण वडस्कर तसेच प्रमुख उपस्थिती शिव व्याख्याते तथा ओबीसी सायकल यात्रा प्रमुख, चंद्रपूर प्रा. अनिल डहाके, साळवे सर, CRPF राहुल फोपरे, उपस्थित होते. ग्रापं सदस्य तथा पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांनी आपली उपस्थिती दर्शवली. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. कु. सार्थक श्रीकृण वडस्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल भूमिका मांडली. मिरवणुकीच्या स्वागतासाठी गावातील घरा घरा समोर रांगोळी काढण्यात आली होती. रांगोळीत प्रथम क्रमांक कु. श्रुती हेमंत बोढे, द्वितीय क्रमांक कु. प्रणाली गोपीचंद वांढरे तर तृतीय क्रमांक कु. संदली प्रकाश विद्ये याना देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रिया पिंगे यांनी तर प्रस्तावना शिव छत्रपती मराठा मंडळाचे अध्यक्ष चेतन पिंगे यांनी केली. आभार चेतन पिंगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिव छत्रपती मराठा मंडळ अध्यक्ष चेतन पिंगे, उपाध्यक्ष राकेश बोढे, सचिव नितीन पिंगे, प्रशांत फोपरे यांच्या समवेत मंडळातील सर्व सदस्य तथा सर्व गावकरी मंडळींनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.