Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: खिर्डी येथे शिव ग्रंथालय उभारणार - शंतनू धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खिर्डी येथे शिव ग्रंथालय उभारणार - शंतनू धोटे खिरडीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - खिर्...

  • खिर्डी येथे शिव ग्रंथालय उभारणार - शंतनू धोटे
  • खिरडीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
खिर्डी येथे जाणता राजा युवा मंडळ व ग्रामवासीयांकडून शिवजयंती तथा शिवमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी युवा नेते शंतनु धोटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शुभांगीताई धोटे, वृषालिताई धोटे, रोहिणीताई धोटे, माजी सरपंच अनुसया कोटनाके, पोलीस पाटील रामदास तोडासे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धनराज मालेकर, मुख्याध्यापक विलास कुडे, शिवराम तुराणकर, सुभाष वायकोर, देविदास ढवस, वामन सत्रे, बंडू, शेरकी, नत्थु मालेकर, वासुदेव कुडे, आनंदराव शेरकी , किशोर, गोहने, बापूराव नागोसे, जाणता राजा युवा मंडळ चे प्रफुल मांडवकर, प्रलय शेरकी, वसंता शेरकी, गोलू गाताडे, सुमित शेरकी, वैभव वायकोर, शेखर ढवस, कपिल गोहने, सूरज गोहने, विठ्ठल कोरडे, प्रफुल हिवरकर, अमोल हिवरकर ,पुनीत राऊत, कवडू मानुसमारे, अमोल गायकवाड, नवनाथ मडावी, शंकर मडावी, मारोती आंबटकर, सुनील हिवरकर, नंदू ढवस श्रीकांत ढवस ,राजू लालसरे, शुभम बावणे, वैभव चापले, शुभम चापले, शिवम चापले, उत्तम शेरकी, प्रदीप मालेकर, यश मालेकर, प्रभाकर मांडवकर उपस्थित होते, मोठ्या संख्येने महिलामंडळ तथा पुरुषमंडळी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
मुख्याध्यापक विलास कुडे यांनी शिवाजी महाराजांचे विचार व त्यांच्या कार्याची यशोगाथा सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंतनु धोटे यांनी खिरडी  मधून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मुलामध्ये रुजावे यासाठी खिर्डी गावामध्ये शिव ग्रंथालय व  शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरो प्लांट लवकरच उभारू अशी घोषणा केली. अरविंद बावणे यांनी शिवगर्जना दिली व केशरी झेंडा दाखवून गावामधून शिवमिरवणुक काढण्यात आली तसेच शिवप्रसाद देण्यात आला. खिर्डी नगरी मध्ये संपूर्ण जलोषात शिवगर्जना देवून शिवमय वातावरण निर्मिती करण्यात आली होती .अतिशय शांतपणे ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संचालन व आभार प्रदर्शन धनराज मालेकर यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top