Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धिडशी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धिडशी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकूडे यांच्या माध्यमातून गावच्या विकासाकरिता ८४.७२ लक्ष रु...

  • धिडशी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
  • जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकूडे यांच्या माध्यमातून गावच्या विकासाकरिता ८४.७२ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध 
  • विविध उपक्रमाच्या माध्यमातून राजांची जयंती साजरी
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
शिवजयंतीचे औचित्य साधून मौजा धिडशी येथे जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांच्या मार्फत एकूण ८४.७२ लक्ष रुपयाच्या विकास निधीचे भूमिपूजन करण्यात आले. सुनिल उरकुडे यांनी आपल्या भाषणात सांगितले कि,धिडशी सारख्या होतकरू गावांना भौतिक सुविधांकरीता समोर पण निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जिप मार्फत धिडशी गावाला विक्रमी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल गावकऱ्यांनी सभापती यांचे आभार मानले.
यानिधीतून सिमेंट काँक्रिट रोडला १० लक्ष रुपये, सिमेंट काँक्रिट नालीला ५ लक्ष रुपये, आरओप्लांट बसविण्याकरिता ५ लक्ष रुपये, वर्ग खोल्या बांधकाम करिता २२ लक्ष रुपये, मुख्य जलवाहिनीचे काम करण्याकरिता २८ लक्ष रुपये, हायमास्ट लावण्याकरिता १.७२ लक्ष रुपये, बंधारा बांधकाम करिता १३ लक्ष रुपये, एकूण ८४.७२ लक्ष रुपयांचा विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून माजी आमदार अँड. संजय धोटे, अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शन निमकर, जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे, प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमो महाराष्ट्र उपाध्यक्ष रघुवीर हंसराज अहिर, नगरसेवक राजू डोहे, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, माथरा सरपंच हरिदास झाडे, धिडशी सरपंच रीता हनुमंत, उपसरपंच राहुल सपाट, राहुल सूर्यवंशी, सचिन शेंडे, रवी गायकवाड, ग्राम सदस्य संतोष काकडे, विनोद कोरडे, मायाबई जिवतोडे, सिंधुबाई निखाडे, मंगला धोके, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष बंडू काकडे, सुरेश कौराशे, विशाल कौराशे ग्रामसेवक प्राजक्ता अडगोकर व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top