Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विरुरात रक्तदान करून शिवजयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरुरात रक्तदान करून शिवजयंती साजरी अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरुर स्टेशन - राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे छत्रपती शिवाज...

  • विरुरात रक्तदान करून शिवजयंती साजरी
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरुर स्टेशन -
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ विरुर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक येथे विविध उपक्रम राबवून मोठया उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी राहुल चव्हाण ठाणेदार विरुर, सुरेंद्रपल सिंग बावेजा, भीमराव पाला सुधाकर मोरे, अजितसिंग टाक, शाहू नारनवरे, अविनाश रामटेके हे प्रामुख्याने उपस्थित होते. 
शिवजयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी विरुर येथिल ठाणेदार राहुल चव्हाण यांच्यासह 52 युवकांनी रक्तदान करून उत्साहात अधिकच भर पाडला तसेच यावेळी ई श्रमदान कार्ड, ई पासेस, पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक या मोफत सुविधांचा विरूरतील व विरुर परिसरातील अनेक नागरीकांनी लाभ घेतला. तसेच कार्यक्रमच्या शेवटी भोजनदान देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता तुषार मोरे, योगेश बक्षी, प्रणय येरोजवार, इरफान सय्यद, स्वप्नील भोसकर, सुरज भोसकर, प्रीतम झाडे, विक्की मोरे, नयन उराडे, शुभम उराडे, सचिन फटले, संतोष भावा उपरे, विक्की विश्वास यांनी परिश्रम घेतले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top