Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भर चौकात तरुणाची हत्या घुग्घुस शहर हादरले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भर चौकात तरुणाची हत्या घुग्घुस शहर हादरले आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स घुग्घुस - जिल्ह्यात १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उ...

  • भर चौकात तरुणाची हत्या
  • घुग्घुस शहर हादरले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
घुग्घुस -
जिल्ह्यात १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह असतांना दुसरी कडे एका तरुणांचा गळा भर चौकात कापण्यात आल्याची धक्कादायक घटना घुग्घुस शहरात काल रात्री १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान बँक ऑफ इंडिया समोर घडली. २५ वर्षीय कादर शेख या तरुणांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत काही अज्ञात तरुणांनी हल्ला चढविला सदर तरुण जमिनीवर पडला असता मारेकऱ्यांनी त्याच्या गळ्यावर वार करीत ठार केल्याच वृत्त आहे मृतक कादर हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता तसेच त्याच्यावर खून मध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बँक ऑफ इंडिया समोर कादर ने हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला होता. नेमकं सदर हत्याकांडाच कारण काय? कादर चे मारेकरी कोण याचा तपास घुग्घुस पोलीस करत आहे. ऐन शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशीच अशा प्रकारची हत्या करून पोलिसांना एक प्रकारे आवाहन देण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न आहे की काय? ज्या ठिकाणी कादर ने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी ठार करण्यात आले. हत्येची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास घुग्घुस पोलीस करत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top