शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
राज्य सरकारने नुकताच सुपर मार्केट व किराणा दुकानांमध्ये दारू, वाइन विक्रिला परवानगी दिली आहे. हा निर्णय योग्य नसून त्याचा सगळीकडे निषेध नोंदविला जातो आहे. वं राष्ट्र संत श्रीतुकडोजी महाराजांनी आयुष्यभर भजनाच्या व भाषणाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी फार मोठे परीश्रम घेतले आणि राज्य सरकार व्यसनमुक्ती विषयी धोरण राबवत नसून पुनच्छा चंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविली आहे. आत्ता चक्क सुपर मार्केट व किराणा दुकानांमध्ये दारू, वाइन विक्रिला परवानगी देत आहे याचा निषेधार्थ श्री गुरूदेव सेवा मंडळ तुकुम, ऊर्जानगर व इंदिरानगरतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन तत्काळ हा निर्णय रद्द करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील या सामाजिक कार्यात इतरही गुरुदेव सेवा मंडळांनी सहभागी होऊन निवेदने देऊन यांचा निषेध नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी श्रीगुरुदेव सेवा मंडळ तुकुमचे अध्यक्ष बबनराव अनमूलवार, उपाध्यक्ष संतोष राऊत, सचिव रामराव धारणे, कोषाध्यक्ष देवराव बोबडे, भाऊराव बावणे, दयाराम ननावरे, गणेश रोडे तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरचे सेवाधिकारी शंकर दरेकर, देवराव कोंडेकर, खेमदेव कन्नमवार, सतिश लोंढे, विठ्ठल ननावरे, परशुराम धांडे आदीची उपस्थिती होती. तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ इंदिरानगरचे अध्यक्ष प्रकाश पोहनकर, अरुण चांदेकर, भास्कर ईसनकर, भास्कर भोकरे, आनंदराव मांदाळे, पुरुषोत्तम राऊत, केशव गराटे तसेच महिला सेविका माया बोबडे, शारदा रोडे, माया मांदाळे, शालिनी धारणे, सरस्वती धमाणे, इंदू व-हाटे, सिंधू दडमल, संगीता जोगी, मंजुळा हिवरकर, वीणा शेंडे, सुनंदा उइके तसेच चंद्रपुरातील गुरूदेव सेवा मंडळाचे सेवक सेविका यांची उपस्थिती होती.
युवापिढीवर परिणाम?
मॉल व किराणा दुकानात खुलेआमपणे वाइन विक्री सुरू झाली तर समाजाचे आरोग्य ढासळण्याची शक्यता आहे. युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. जर युवापिढीच बलशाही नसेल तर देशाचे भविष्य कसे सुदृढ राहील. त्याशिवाय अनेक मुले व्यसनाधिन होण्याची शक्यता आहे.
गुरुदेव भक्त पुढे सरसावले
वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी आयष्यभर भजनाच्या व भाषणाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी फार मोठे परीश्रम घेतले. युवक व समाजाला व्यसनमुक्त जगण्याचा सल्ला दिला. परंतु आघाडी सरकारला राष्ट्रसंताच्या विचाराच्या विरूध्द निर्णय घेतला आहे. आता मॉल व किराणा दुकानातून वाइन विक्री निर्णयाचा गुरूदेव भक्तांकडून तीव्र निषेध करून निर्णय मागे घेण्याची मागण होत आहे. आतापर्यंत भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी, आदी तालुक्यातील गुरूदेव भक्त रस्त्यावर आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.