Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा फ्लॅटबद्दलची माहिती लपवणे पडले महागात आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्...

  • शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा
  • फ्लॅटबद्दलची माहिती लपवणे पडले महागात
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मुंबई -
राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारेंनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.
बच्चू कडूंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती लपवणे त्यांना महागात पडले. बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असुन देखील 2014 ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नसल्याचा आरोप बच्चू कडूंवर होता. याच आरोपांवरुन 2017 मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता.

बच्चू कडूंनी फेटाळले होते आरोप
बच्चू कडू यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी ते फेटाळून लावले होते. राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपये कर्ज देखील उपलब्ध करुन दिले होते. मात्र कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांपूर्वीच ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडू यांनी त्यावेळी केलेला होता. त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे 2017 मध्ये बच्चू कडूंनी म्हटले होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top