आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागभीड -
नागभीड तालुक्यातील कोटगांव येथील सुरज रंधये (28) हा 10 फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून बालापूर मार्गावरून म्हसली ला जात असतांना रस्ता कच्चा असल्याने वाहन सावकाश चालवित जात होता. मात्र वाटेतच दबा धरून बसलेल्या वाघाने सुरजवर झडप घेतली. मात्र, नवीन बलवंत्तर म्हणून सुरज थोडक्यात बचावला. सुरज हा बालापूर मार्गावरून म्हसलीला जायला निघाला होता. रस्ता कच्चा असल्याने तो वाहन सावकाशपणे चालवित होते. दरम्यान वाटेतच दबा धरून बसलेल्या वाघाने सुरजच्या वाहनावर झडप घेतल्याने तो खाली पडला. याकारण वाहनाची मागील सीट फाटली. मात्र, सुरजचे वाहन सुरूच होते. वाघही वाहनजवळ उभा होता. मात्र, हिम्मत करित तो वाहनावर बसला व बालापूर मौशी मार्गे कोटगावला कसाबसा पोहचला. मात्र, घडलेल्या अपघातामुळे तो फार घाबरलेला होता. घरी पोहचताच त्याला भोवळ आली व तो खाली पडला. त्याच्या शरीराचा थरकाप उडाला होता. त्याने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. वाहनावरून पडल्याने पायाला जखम झाली आहे. मात्र शेवटी नबीश बलवंत्तर म्हणून सुरजचे प्राण वाचले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.