धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
RTI कार्यकर्त्याला 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने रंगेहात अटक केली. गडचांदूर शहरातील महावितरण विभागात कार्यरत उपकार्यकारी अभियंता याला बोगस बिले सादर केल्या बाबत माहिती अधिकारात RTI कार्यकर्ता सौरभ विजय बुरेवार याने माहिती मागितली.
व याबाबत तक्रार वरिष्ठ कार्यालयाला करणार नाही व आधीची तक्रार परत घेणार पण त्यासाठी 10 लाख रुपये लागतील अशी मागणी फिर्यादीला केली. मात्र पैसे देण्याची फिर्यादीला मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेत याबाबत तक्रार दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आरोपीला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. तक्रारीची पूर्ण शहानिशा केल्यावर 10 फेब्रुवारीला रोमा बार जवळ भेटत आरोपी सौरभ बुरेवार यांनी फिर्यादीला तडजोडीअंती 5 लाख रुपये व टोकन अमाउंट 50 हजार रुपये घेताना रंगेहात अटक करण्यात आली. आरोपी सौरभ बुरेवार ला ताब्यात घेत रामनगर पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोउपनी अतुल कावळे, पंडित वर्हाडे, मिलिंद चव्हाण, अनुप डांगे, जमिल पठाण, सायबर सेल चे मुजावर अली यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.