विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पोवनी कोळसा खाणीच्या चेक पोस्ट क्रमांक दोन येथे ट्रक चालकाने ट्रक तपासणी करित असतांना तेथील उच्च विद्यत दाबाच्या विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्य झाल्याची घटना बुधवारी 9 तारखेला रात्री 11 वाजताच्या सुमारास घडलील. पोवनी कोळसा खाणीच्या चेक पोसट वर सुरक्षा रक्षकाच्या म्हणण्यानुसार ट्रक चालक ट्रकचा जॅक उचलताच वर असलेल्या उच्च विद्युत दाबाच्या विजेच्या तारांना स्पर्श वाहन चालकाला झाला. लहु रामदास फटाले (30) असे या दुर्दैवी चालकाचे नाव आहे. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली. दरम्यान रुग्णवाहिकेतून प्रेत नेत असतांना इतर चालकांनी आर्थिक मदतीची मागणी केली. शेवटी वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपात आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. नंतर प्रेत शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. मृत चालक हा मूळ चिंचोली येथील रहिवासी असून तो सास्ती येथे वास्तव्यास होता.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.