- ई-श्रमिक कार्ड नोंदणीमुळे श्रमिकांचा आत्मविश्वास वाढला - डॉ. मंगेश गुलवाडे
- भाजपा महानगर सचिव रामकुमार आक्कापेल्लीवार यांच्या पुढाकाराने श्रमिक कार्ड नोंदणी शिबिर संपन्न
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वार्ड येथील शास्त्रकार ले आऊट व जैन गॅरेज मागील परिसरात महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी महानगर सचिव रामकुमार आक्कापेल्लीवार यांच्या पुढाकाराने ई-श्रमिक कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आणि त्या योजना यशस्वी झाल्या आता केंद्र सरकारच्या वतीने श्रमिकांच्या नोंदणीचे अभियान राबविण्यात येत आहे त्यामुळे श्रमिकांचे आत्मविश्वास वाढले असून या नोंदणीचा त्यांना नक्कीच फायदा होईल असे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महामंत्री ब्रिजभुषन पाझारे, ई- श्रमिक कार्ड नोंदणी प्रमुख आशिष पिल्लई, भारतीय जनता युवा मोर्चा महानगर सचिव प्रवीण उरकुडे, कावेरी शाहा, रीता शाहा, जयदेव शाहा, चंदा बांगरे, सुकुमार सरकार, प्रीती चौधरी, तृप्ती मंडल, रीना बर्मन, मोनिका डे, मुस्कान केवट, कांचन सिंग, टिना केवट, रीता मालेकर, नंदिता कर्मोकर, अपर्णा कर्मोकर, कमल ओझा, रमेश नागले, व्यंकटेश चाकिनाराप, सुधाकर चकीनाराप, शिवा नागले, हर्ष ओझा, सुमन यादव, लक्ष्मी ओझा, ज्योती पांडे, दिव्या पांडे, कल्पना कोटावार, सुमन नागले, रमा गोमासे, शकुंतला यादव, सरोजा पांजा, विमला यादव, छाया सूखदेवे, ज्योती रामटेके, ललिता साहू, राजकुमारी साहू, बाळकृष्ण राजभर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर वार्डातील नागरिकांनी ई - श्रमिक नोंदणी शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.