Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोळसा चोरून नेताना ट्रक पकडला महाराष्ट्र सुरक्षा बलाची कामगिरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोळसा चोरून नेताना ट्रक पकडला महाराष्ट्र सुरक्षा बलाची कामगिरी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - वेकोलिच्या बल्लारपुर क्षेत्रात येणाऱ्...

  • कोळसा चोरून नेताना ट्रक पकडला
  • महाराष्ट्र सुरक्षा बलाची कामगिरी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
वेकोलिच्या बल्लारपुर क्षेत्रात येणाऱ्या गोवरी ओपनकास्ट कोळसा खाणीमधून 4 फेब्रुवारीला रात्री 11 वाजता ट्रकमध्ये कोळसा भरून चेक पोस्टमधून नेतांना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी शिताफीने पाठलाग करून पकडला. मात्र यावेळी ट्रक चालक पळून गेला. महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान प्रदीप सानप, प्रवीण सोनोने आणि वेकोलिचे सुरक्षा प्रहरी रामास्वामी रोढा हे गोवरी चेक पोस्ट क्रमांक एक येथे कर्तव्यावर असताना ट्रक क्रमांक एमएच 40वाय 4314 हा कोळसा भरलेला ट्रक जाताना दिसला. या ट्रक चालकाने नोंदणीसाठी ट्रक न थांबविल्याने सुरक्षा जवानांनी ट्रकचा पाठलाग करून चेक पोस्ट पासून शंभर मिटर अंतरावर पकडला. मात्र, ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. बारा चाकी असलेल्या या ट्रकची किंमत अंदाजे 6 लाख व 20 टन कोळश्याची किंमत 30 हजार असा एकूण 6 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. चोरीची सर्व माहिती महाराष्ट्र सुरक्षा बलाचे वरिष्ठ अधिकारी विक्रम दोडके व वेस्टर्न कोल्फील्ड लिमिटेडचे सुरक्षा अधिकारी राजूरकर यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार सुरक्षा रक्षक निरंजन पाटील यांनी राजुरा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करीत कोळसा व ट्रक जमा केला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे, कुळमेथे, संपत पलीपाका हे अधिक तपास करीत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top