- राजुराच्या डॉक्टरांवर आरएमओची कारवाई
- खाजगी दवाखान्यात उपचार करणाऱ्या सरकारी डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस
- नर्सिंग होमकडूनही उत्तर मागितले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
नर्सिंग होमला रुग्णांना दाखल करण्याची आणि उपचार करण्याची परवानगी नसतानाही तसेच सरकारी रुग्णालयात असूनही त्यांच्या खासगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाके यांच्या पथकाने नर्सिंग होम बंद करून शासकीय डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या कारवाईमुळे परवानगीशिवाय उपचार करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाचे आरएमओ डॉ. किन्नाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरा शहरातील डॉ. कातकर हे नर्सिंग होमची परवानगी नसतानाही रुग्णांना उपचारासाठी दाखल करून उपचार करत होते. तसेच डॉ. चिंदमवार हे राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी तत्वावर डॉक्टर आहेत. असे असतानाही त्यांचे खासगी दवाखान्यात रुग्णांवर उपचार सुरू होते. दोन्ही डॉक्टरांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पथकासह तपास करण्यात आला. तपासणीत त्यांना तक्रार योग्य असल्याचे आढळून आले. डॉ.कातकर यांच्या नर्सिंग होमला बंद करून त्यांना जाब विचारण्यात आला आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले डॉ.चिंदमवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे शासकीय रुग्णालयात सेवा देऊन खासगी रुग्णालयांमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांमध्ये घबराट पसरली आहे. कारवाई करणाऱ्यांमध्ये आरएमओ डॉ. हेमचंद किन्नाके, बोरीकर, भारद्वाज आदींचा समावेश आहे.
डॉ. कातकर यांचे म्हणणे एकूण घेण्याकरिता त्यांचेशी संपर्क साधला असता त्यांचेशी संपर्क होऊ शकला नाही.
द्वेष भावनेतून हेतु पुरस्पर कारवाई - डॉ. चिंदमवार
राज्यात सुमारे 750 डॉक्टर आयुष अंतर्गत आणि सुमारे 2000 RBSK अंतर्गत सेवा देत आहेत. ज्यामध्ये अनेक डॉक्टर सरकारी रुग्णालयात सेवा देण्याबरोबरच खासगी प्रॅक्टिसही करतात. शेवटी, रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी, त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे हे देखील डॉक्टरांचे कर्तव्य आहे. मात्र एका पत्रकाराला जाहिरात न दिल्याने त्याच्या इशाऱ्यावरून द्वेष भावनेतून हेतु पुरस्पर कारवाई झाली.
- डॉ. चिंदमवार
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.