- विनामास्क फिरणाऱ्या ९४ लोकांवर कारवाई
- १८,८०० रुपयांचा दंड वसूल
- महसूल, पोलीस व नगर परिषदेची संयुक्त कारवाई
- तीन आस्थापनेवरही कारवाई
- आपली सुरक्षा आपल्या हाती, मास्क घाला कोरोना टाळा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राजुरा शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, ठोक - किरकोळ विक्रेता, दुकानदार व इतरांना मास्क लावण्याबाबत निर्देश व विनंती करण्यात आली होती परंतु सगळ्यांना सूचना व आव्हान केल्यानंतरही शहरातील बरेच नागरीकांनी नियमांचे पालन न करत असल्यामुळे आज नगर परिषद राजुरा, पोलीस विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर २०० रु प्रमाणे ९४ नागरिकांवर कार्यवाही करून १८,८००/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोविडरोधी नियमाचे पालन न करणाऱ्या एका आस्थापनेस सील करण्यात आले तसेच शहरातील तीन आस्थापना दुकानवर दंडात्मक कार्यवाही करत एकूण २४,८०० एवढा दंड वसुल करण्यात आला. सदर कारवाई तहसीलदार हरीश गाडे, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या चमूद्वारे करण्यात आली.
या कारवाईत प्रामुख्याने नगर परिषद चौक, पंचायत समिती चौक, नाका न. 3, गांधी चौक येथे नगर परिषद अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस विभाग मार्फत संयुक्त कार्यवाही करण्यात आली सदर कार्यवाही नप प्रशासकीय अधिकारी विजय जांभूळकर, अभिनंदन काळे, आदित्य खापणे, उपेंद्र धामंगे, संकेत नंदवंशी, सतिश देशमुख, शौकत कुरेशी, रमेश बावणे, ओमप्रकाश गुंडावार, जयप्रकाश पांडे, रोशन ढोके, संजय जोशी, अनुप करमरकर, हरिश पाटील, हंसराज बच्चाशंकर, बाबुराव गोगलवार, राजु कवठे, विनोद आरमुलवार, नुसरत अली, दिलीप नंदीमगवार, राजु लांडगे महसूल व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी केली.
तहसीलदार हरीश गाडे व मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर यांनी नागरिकांना विनंतीवजा आवाहन केले कि सध्या कोरोनाचा वाढत पादुर्भाव बघता यापुढेही दिवसेंदिवस कडक कार्यवाही होणार असुन नागरिकांनी कोविड नियमांचे प्रशासनाने नियम पाळावेत. प्रशासनाचा कोणत्याही नागरिकांवर वा आस्थापनेवर कार्यवाही करण्यातचा हेतू नाही परंतु कोविडरोधी नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कार्यवाही होत राहील. नागरिकांना सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.