Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरपनात काँग्रेस ने राखला गढ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपनात काँग्रेस ने राखला गढ काँग्रेसला १२ तर भाजपा, संघटना आणि इतरांना ५ जागा विजयराव बावणे विजयाचे शिल्पकार - सुभाष धोटे बघा व्हिडीओ काय म...


  • कोरपनात काँग्रेस ने राखला गढ
  • काँग्रेसला १२ तर भाजपा, संघटना आणि इतरांना ५ जागा
  • विजयराव बावणे विजयाचे शिल्पकार - सुभाष धोटे
  • बघा व्हिडीओ काय म्हणाले आमदार सुभाष धोटे
धनराजसिंह शेखावत  - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना नगर पंचायतीच्या निवडणुकीत  विजयराव  बावणे  यांनी  पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे.
नितीन विजयराव बावणे यांनी राजकारणात दमदार ‘एन्ट्री’ करीत ‘काका’ ला चित केले आहे. काँग्रेस विरुद्ध इतर सर्व असा सामना असल्याने जिल्ह्याचे लक्ष कोरपना नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते.
आज, बुधवारी लागलेल्या निकालात काँग्रेसने तब्बल 12 जागा जिंकल्या असून बीजेपी, संघटना आणि इतरच्या गटाला फक्त 5 जागावर समाधान मानावे लागले आहे. शंकरराव गिरडकर यांची सून टीना गिरडकर यांनाही पराभव पत्करावा लागला असून गीता डोहे विजयी झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक 1: नंदाताई बावणे – 233, विजय मसे – 106, प्रभाग क्रमांक 2 : मनीषा लोडे -245, नीता मुसळे 105, प्रभाग क्रमांक 3: नितीन बावणे 163, किशोर बावणे- 80, प्रभाग क्रमांक 4: इस्माईल शेख- 109, शुभम झाडे – 68, प्रभाग क्रमांक 5: शेख निसा – 108, अली सुहेल – 103
प्रभाग क्रमांक 6: देविका पंधर- 126, पूजा देरकर – 120, प्रभाग क्रमांक 7: मनोहर चन्ने – 80, )शारीक अली-60, प्रभाग क्रमांक 8 : जोशना खोबरक-158, जोशना वैरागडे- 93, प्रभाग क्रमांक 9: मोहम्मद शेख- 86, पवन बुरेवार 79, प्रभाग क्रमांक 10, लक्ष्मण पंधरे – 133, सुभाषआत्राम- 92, प्रभाग क्रमांक 11, सोनू बुरेवा -109, वर्षा लांडगे-131, प्रभाग क्रमांक 12, मंगला पारखी – 85, आशा झाडे- 163, प्रभाग क्रमांक 13, संगीता पंधर- 86, सविता तुमराम-108, प्रभाग क्रमांक 14: राधिका मडावी – 117, जया मेश्राम- 68, प्रभाग क्रमांक 15, टीना गिरडक-119, गीता डोहे -127, प्रभाग क्रमांक 16, दिलीप जाध-98, सुभाष हरबडे-110, प्रभाग क्रमांक 17: आरिफा शेख -98, बहिदा हुसेन -45
याप्रमाणे निकाल घोषित झाले असून विजयाचे शिल्पकार विजयराव बावणे व विजयी उमेदवारांचे आमदार सुभाष धोटे, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूरची नगराध्यक्षा सविताताई टेकाम यांनी अभिनंदन केले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top