- जिवती नगर पंचायत वर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय
- गोंडवाना गणतंत्र पार्टीला ५ जागेवर मानावे लागले समाधान
- भाजपा ला खातेही उघडता आले नाही
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
जिवती -
जिवती नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. आमदार सुभाष धोटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलाश राठोड यांनी आपली सत्ता राखली आहे. जिवती नगर पंचायत मध्ये काँग्रेसने ६ जागा व राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर गोंडवाना गणतंत्र पार्टीला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
जिवती नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यातील १२ जागा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात आल्या आहेत. गोंडवाना गणतंत्र पार्टीला ५ जागा मिळाल्या असून भाजपाला भोपळाही फोडता आलेला नाही.
दरम्यान, मागील वेळी जिवती नगर पंचायत मध्ये पहिले अडीच वर्षे काँग्रेसची एकहाती सत्ता होती तर नंतरची अडीच वर्षे भाजपाची सत्ता होती. तरी पण आता भाजपाला खाते उघडता आले नाही ही चिंतनाची बाब असून राजुरा विधानसभा क्षेत्रात दोन माजी आमदार असून सुद्धा विधानसभा क्षेत्रात भाजपाला पिछाडीवर जावे लागल्यामुळे आता भाजपाला चिंतनाची गरज असल्याचे म्हटले जात आहे.
यावेळी महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे पुन्हा एकदा एकहाती सत्ता आली आहे. तरी सर्व निवडून आलेल्या नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्त्या मध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.