Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वनविभागाने जप्त केलेल्या अवैध वाळूच्या ट्रॅक्टरला कोणतीही कारवाई न करता सोडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वनविभागाने जप्त केलेल्या अवैध वाळूच्या ट्रॅक्टरला कोणतीही कारवाई न करता सोडले कोरपना तहसीलदारांचा प्रताप निष्पक्ष चौकशी करून दोषीयांना कठोर ...
  • वनविभागाने जप्त केलेल्या अवैध वाळूच्या ट्रॅक्टरला कोणतीही कारवाई न करता सोडले
  • कोरपना तहसीलदारांचा प्रताप
  • निष्पक्ष चौकशी करून दोषीयांना कठोर शिक्षा करण्याची मागणी : विजय ठाकरे
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या कोरपनाचे तहसीलदारावर वनविभागाने पकडलेल्या अवैध वाळूच्या ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याचे एका माहिती अधिकाराच्या अहवालातून उघडकीस आले आहे. कोरपणाचे कोरपण्याचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्टर मालकावर कोणतीही दंडनीय कार्यवाही न करता सोडने व सेवाशर्ती च्या नियमाचे उलंघन केल्याने त्यांना सेवेतुन बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
प्राप्त माहितीनुसार कामगार नेते व समाजसेवी विजय ठाकरेने महसूल आयुक्त मैडम नागपुर यांना एका निवेदनात तहसीलदार कोरपना महेद्र वाकलेकर विरुद्ध तक्रार दिली दिनांक १ डिसेम्बर २०२० रोजी तत्कालीन वनक्षेत्र अधिकारी जयकुमार वनसडी यांनी रात्रीच्या गस्ती वेळी भोयगाव-तलोधी मार्गावर रेती चोरी करून अवैद्य वाहतूक करत असलेल्या एक ट्रैक्टरला पकडले. ट्रैक्टर जप्त करून ड्राइवर व ट्रैक्टर लेबर वर फॉरेस्ट एक्ट प्रमाणे कार्यवाही केली व विना परवाना ट्रैक्टर आणि साहित्य जप्त करून पंचनामा केला व फारेस्ट ऑफिस गडचांदुर येथे जमा करण्यात आले. जेव्हा महसुलातील अधिकाऱ्यांना कळले कि रेती चोरी चे ठिकाण इरई तामशी हे महसूल विभागाचे क्षेत्र असल्याने सदर वाहन त्वरीत महसूल विभागाला हस्तातर करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी वनविभागाला दिले.
वन विभागाचे वरिष्ठ अधिकरी ब्रम्हटेके यांनी कागदी कार्यवाही पूर्ण करून सदर वाहनावर पुढील दंडाची कारवाई करण्यास तहसीलदार वाकलेकर यांचे प्रतिनिधि मंडल अधिकारी नारायण चव्हाण यांना सुपूर्दनामा ताब्यात दिले. अपेक्षे प्रमाणे महसूल कायद्याच्या तरतुदी अनुसार हया ट्रैक्टर वर रु. १,१०,६०० इतका दंड करने अपेक्षित होते. परंतु सदर ट्रॅक्टर मालकावर कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. त्या खास ट्रॅक्टर मालकाला कोरपना तालुक्यात बिना टीपी दैनंदिन २ ट्रिप गौण खनिज चोरी करने व विक्री बाबत विशेष सूट दिली आहे असे बोलल्या जात आहे. असले प्रकार निंदनीय तितकेच संतापजनक आहे आणि तहसीलदार कोरपना यांच्या अनेक भ्रष्ट कारभाराची तक्रार सन्माननीय महसूल आयुक्त, नागपुर व जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे कड़े केलेली आहे. जबाबदार अधिकारी नेमुन व निष्पक्ष चौकशी करून दोषीयांना कठोर शिक्षा करण्याची मागणी विजय ठाकरे यांनी केली आहे. याबाबत आमचा विदर्भचे प्रतिनिधी धनराजसिंह शेखावत यांनी तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांचेशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र फोन न उचलल्याने त्यांच्या प्रतिक्रिया मिळू शकल्या नाही. 
आमच्या वरील अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील दंडाची कारवाई करण्यास आम्ही रीतसर कागदी कारवाई करून जप्त केलेले ट्रॅक्टर नारायण चौहाण, मंडळ अधिकारी कोरपना यांना हस्तांतरित केले. तहसील विभागाने काय कारवाई केली किंव्हा कारवाई केली की नाही केली हे आम्हाला माहित नाही आणि तहसील विभागाने अजूनपर्यंत कळवले ही नाही आहे.
ब्रह्मटेके
वन अधिकारी, वन विभाग गडचांदुर

वन विभागाकडून हस्तांतरित केलेल्या ट्रॅक्टर वर काय कारवाही झाली याची मला जाणीव नाही. या बद्दल तहसिलदार साहेबच पूर्णपणे सांगू शकतील. मला या बद्दल काहीच माहीत नाही.
नारायण चव्हाण
मंडळ अधिकारी, कोरपना तहसील

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top