Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना काळातील कोविड योद्धांचे कार्य अतुलनीय - प्राचार्या स्मिता चिताडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरोना काळातील कोविड योद्धांचे कार्य अतुलनीय - प्राचार्या स्मिता चिताडे महात्मा गांधी विद्यालयात केला महिला कोविड योद्धांचा सत्कार धनराजसिंह...
  • कोरोना काळातील कोविड योद्धांचे कार्य अतुलनीय - प्राचार्या स्मिता चिताडे
  • महात्मा गांधी विद्यालयात केला महिला कोविड योद्धांचा सत्कार
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गेल्या 2 वर्षांपासून कोरोना ने संपूर्ण जगाला हतबल करून टाकले असून अनेकांना प्राण गमवावे लागले. अशा भयावह कोरोना काळात कोविड योध्याचे कार्य अतुलनीय असून स्वतः चा जीव धोक्यात घालून नागरिकांना जीवदान दिले. अशा कोविड योध्याचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे असे मत प्राचार्या सौ. स्मिता चिताडे यांनी कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. स्थानिक महात्मा गांधी विद्यालयात 10 जानेवारी ला  आयोजित सावित्री ते जिजाऊ सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियाना अंतर्गत 'कोविड योद्धयांचा सत्कार' करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून  संस्थेचे  प्रभारी सचिव धनंजय गोरे, उपप्राचार्य विजय आकनूरवार, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक एच.बी. मस्की, सौ. शोभा जिवतोडे उपस्थित होत्या.
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे 3 जानेवारी पासून सावित्री ते जिजाऊ सन्मान. महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले. त्या अंतर्गत 10 जानेवारी ला सभागृहात कोरोना काळात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला कोविड योध्याचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कोविड योध्या पोलीस उप निरीक्षक निशा खोब्रागडे, शिपाई सुषमा आडकीने, आरोग्य अधिकारी डॉ. दीक्षा ताकसांडे, हर्षा भगत, प्रतिभा काळे, आशा वर्कर कल्पना इटनकर, कविता पथाडे, योगिता वांढरे, छायाताई पिदूरकर, नगर परिषदेच्या सफाई कामगार संगीता शेट्टी, प्रांजली शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती नी आपल्याला मनोगतात कोविड काळातील अंगावर शहारे आणणारे स्वानुभव कथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच. बी. मस्की यांनी केले. सूत्रसंचालन श्री. प्रशांत धाबेकर  यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संतोष मुंगुले यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top