धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे खेलो इंडिया अंतर्गत मैदानी दौड स्पर्धा प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या प्रशिक्षण करिता महात्मा गांधी विद्यालयाची धावपटू कु. सोनल फाये (वर्ग 9क) व कु. अंजली राठोड (वर्ग 9क) यांची निवड झाली आहे. या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांमधून 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये निवड होणार आहे.
दौड स्पर्धा प्रशिक्षण साठी निवड झाल्याबद्दल सोनल फाये व अंजली राठोड यांचा 8 जानेवारी ला महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापिका सौ. स्मिता चिताडे व संस्थेचे प्रभारी धनंजय गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक एच. बी. मस्की, शोभाताई जीवतोडे, क्रिडा शिक्षक बबन भोयर, संजय झाडे व इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.