Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्वामी विवेकानंद जयंती प्रित्यर्थ निःशुल्क मास्क वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वामी विवेकानंद जयंती प्रित्यर्थ निःशुल्क मास्क वितरण भारतीय जनता पार्टी बंगाली समाज आघाडीचे आयोजन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रप...

  • स्वामी विवेकानंद जयंती प्रित्यर्थ निःशुल्क मास्क वितरण
  • भारतीय जनता पार्टी बंगाली समाज आघाडीचे आयोजन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
महाराष्ट्र विधीमंडळाच्या लोकलेखा समीतीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा बंगाली समाज आघाडी महानगर चंद्रपूर द्वारा युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त निःशुल्क मास्क वितरण कार्यक्रम भाजपा चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले, सर्वप्रथम कृष्ण नगर स्थित रामकृष्ण मठ मंदिर येथील स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर बंगाली कॅम्प चौक येथे निःशुल्क मास्क चे वितरण करण्यात आले, याप्रसंगी डॉ मंगेश गुलवाडे यांनी सर्वांना मास्क चे महत्व विशद केले व कोरोना प्रतिबंधक सुचना केल्या. 
याप्रसंगी भाजपा बंगाली समाज आघाडी महानगर चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष डॉ दिपक भट्टाचार्य महामंत्री मनोरंजन राॅय, चंदन पाल, कृष्णकांत पोद्दार, कृष्णा कुंडु, दिपक बिश्वास, सचिव अविनाश घरामी, प्रलय सरकार, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, डॉ गिरीधर येळे, शशीकांत म्हस्के यांची उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top