Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: चंद्रपूर जिल्हा - आजचे कोरोना अपडेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर जिल्हा - आजचे कोरोना अपडेट  गत 24 तासात जिल्ह्यात 31 जणांनी कोरोनावरकेली मात  207 रुग्ण नव्याने बाधित  शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रत...

  • चंद्रपूर जिल्हा - आजचे कोरोना अपडेट 
  • गत 24 तासात जिल्ह्यात 31 जणांनी कोरोनावरकेली मात 
  • 207 रुग्ण नव्याने बाधित 
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या सहाशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 31 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 207 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यू संख्या शून्य आहे.आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 118, चंद्रपूर 18,बल्लारपूर 20, भद्रावती 30,ब्रह्मपुरी 4, नागभीड 4, सिंदेवाही 1, मुल 2, सावली 2, राजुरा 1, चिमूर 2, वरोरा 2, तर कोरपना येथे 3 रुग्ण आढळून आले असून  पोंभूर्णा, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 89 हजार 629 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 401 झाली आहे. सध्या 683 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 13 हजार 404 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 22 हजार 101 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1545 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top