- श्री शिवाजी महाविद्यालयात रासेयो तर्फे युवा दिनानिमित्त व्याख्यान
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने "स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातील भारत आणि आजचा युवक" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, या व्याख्यानाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ प्रशांत आर्वे चंद्रपूर हे लाभलेले होते, त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर विस्तृत विवेचन करतांना, त्यामध्ये स्वामी विवेकानंदाचे कार्य हे अनेक बाजूने महत्वपूर्ण असून त्यांच्या तत्त्वज्ञानानुसार तरुणांनी ध्येय ठरवून धेयसिद्धी साठी मार्गक्रमण केल्यास नक्कीच यशस्वी होता येईल असे भाष्य केले. स्वामीजींनी सांगितलेली पंचसूत्री नुसार म्हणजेच आत्मविश्वास, ध्येयवादी, लक्ष केंद्रीकरण, दुर्लक्ष करण्याची वृत्ती आणि निस्वार्थीपणा यानुसार मार्गक्रमण केल्यास देशातील युवाशक्ती देशाला नक्कीच गतवैभव प्राप्त करून महासत्ता बनवेल यात कुठलीही शंका नाही, सोबतच आजच्या युगात अंतर्मुख होऊन स्वमूल्यांकन करत राष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वानी बांधील असायला हवे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वारकड, तसेच प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य वरीष्ठ विभाग डॉ. खेराणी, IQAC समन्वयक डॉ. मल्लेश रेड्डी, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ राजेंद्र मुद्दमवार, इतिहास विभाग प्रमुख प्रा. गुरुदास बलकी, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी आणि रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. गुरुदास बलकी यांनी प्रास्तविक डॉ. राजेंद्र मुद्दमवार तर आभार डॉ. नागनाथ मनुरे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.