शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
अखिल भारतीय डी.एन.टी. वेलफेअर संघ दिल्ली महाराष्ट्र जिल्हा चंद्रपूर व विदर्भ बेलदार, तत्सम जमाती संघटना यांचे विद्यमाने स्थानिक तारा लॉन येते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे १२२ व्यां जयंती निमित्य आदरांजली व विविध सामाजिक कार्यकर्ता, कोरोना काळातील निवडक कोरोणा योध्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. सौ प्रभाताई चिलके सामाजिक कार्यकर्त्या ह्या अध्यक्षीय स्थानी होते तर चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार उद्घाटक होते. अनिल बोरगमवार, अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रतिष्ठान पप्पू देशमुख सदस्य मनपा चंद्रपूर, कृष्णाजी नागपुरे, जिल्हाअध्यक्ष भोई समाज सेवा संघ चंद्रपूर, दिवाकर बावणे चंद्रपूर जिल्हा गोधळी समाज संघटना, बंडूपंत गंड्रतवार, दिवाकर पुद्दटवार, सेवानिवृत्त मुख्यद्यापक चंद्रपूर, चंद्रशेखर कोटेवार प्रांतीय अध्यक्ष विदर्भ बेलदार तत्सम जमाती संघटना, आनंदराव अंगलवार, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अखिल भारतीय डी. एन.टी वेलफेअर संघ दिल्ली, रंजना पारशिवे महिला अध्यक्ष इत्यादींचे उपस्थित कर्मवीर दादासाहेब कन्नमवार माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिमेला हार अर्पण व दिप प्रज्वलन करुन किशोर जोरगेवार यांचे हस्ते उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी त्यांचे उद्घटिकिय भाषणातून कर्मवीर दादासाहेब कन्नमवार माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे जीवन व यशस्वी जीवनावर प्रकाश टाकताना विदर्भ व महाराष्ट्राचे इतिहासात कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे सारखे सामाजिक, राज्यकिय क्षेत्रात घरातील प्रतिकूल आर्थिक परिस्थिती वर मात करून शैक्षणिक दशे पासूनच कर्मट, ध्येयवादी देशभक्त, पत्रकारितेत शिरोमणी, समाजमन ओळखणारे, सामाजिक नाड जोपासणारे, विकासपुरुष व महारष्ट्र राज्याचे अनेक मुख्यमंत्री पैकी राजकारणात वेगळे ठसा उमटवणारे, आरोग्य, रस्ते, नदीवरील पूल बांधकाम, देश संरक्षण,शेती,क्षेत्रात असामान्य विकास घडवून आण न्यासाठी द्रुतगतीने निर्णय घेणारे, महाराष्ट्राचे द्वितीय व विदर्भातील प्रथम मुख्यमंत्री हे आपल्या चंद्रपूर जिल्हा व चंद्रपूर शहरात जन्म झाले याचे सार्थ अभिमान असून हे अपल्याविभागतील रत्न यांचे बद्दल बोलताना कर्मवीर दादासाहेब कन्नमवार माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे प्रगल्भ दूरदृष्टीवादी लोकनेते असे किशोर जोर्गेवार आमदार यांनी संबोधले. अध्यक्षीय भाषणात प्राभाताई चिलके यांनी त्यांचे बालपणातील शिक्षण, विद्यार्थी दशेपासून देशप्रेम स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, राजकारणातील ओड, जनसंपर्क कौशल्य, याआधारे सार्वजनिक क्षेत्रातील प्रगती व त्यांचे कुटुंबातील समर्पण व त्यागी वृत्तीचे अनेक घटना सांगून वर्तमान काळातील युवकांनी व विशेषतः राजकारणातील नेत्यांनी दादासाहेब कन्नमवार यांचे विचार व कृती आपले जीवनात आत्मसात करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले, याप्रसंगी पप्पू देशमुख,अनिल बोरगमवार , कृष्णाजी नागपुरे, इरफान भाई शेख, चंद्रशेखर कोटेवार यांचे सामाजिक प्रश्नांचे मांडणी इत्यादींचे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यंचेप्रती समायोचीत भाषण केले. या संघटने चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आनंदराव अंगलवार यांनी कार्यक्रमाचे उद्देश व कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे विचार व व्यक्तिमत्व नविन पिढीला अवगत करण्याचे व त्यांचे कृती व स्मृतींना समाजात प्रचार व प्रसार करण्याचे हेतू व्यक्त केले. .या् प्रसंगी सामाजिक क्षेत्रातील विविध सामाजिक कार्यकर्ता व कोरोना काळात विविध ठिकाणी मदतकार्य राबविणारे आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस प्रशासन व समाजातील विविध मान्यवरांचे जसे सर्वश्री बंडूपंत गनड्रतवार, अनिल बोरगमवार, दिवाकर पुद्दटवार , अशोक जाधव, नंदाताई नागपुरे, रतन शिलावार प्रमोद एडलावार, सचिन चलकलवार सह विविध व्यक्तीचे "कोरोना योद्धा " "सन्मान चिन्ह" देऊन संघटने तर्फे मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन आनंदराव अंगलवार, नेत्राताई इंगुलवार यांचे उत्कृष्ठ नियोजनाने संपन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला बंडीवार तर अशोक पडगेलवार यांनी आभार मानले.कारोना चे नियम पळून कार्यक्रम यशस्वितेसाठी विजय पोहनकर, रतन शिलावार, सौ. उज्वला चिलके कु. इंगुलवार, कू. वर्मा, सुभाष हजारे, मनिष कन्नमवार, सचिन चलकलवार, पवन कन्नमवार, पुरमशेट्टीवार, गोर्लावार इत्यादी युवकांनी अथक परिश्रम घेतले..
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.