Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - कोरोना विषाणू...

  • महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरोना विषाणू चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात येत आहेत. 7 जानेवारी ते 10 जानेवारी पर्यंत स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू करून 11 वी 12 वी च्या कला, विज्ञान व एमसीव्हीसीच्या एकूण 684 विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेम्भे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करण्यात आले, प्राचार्या सौ. स्मिता चिताडे, उपप्राचार्य विजय आकनूरवार, एमसीव्हीसी विभागाचे प्रमुख प्रा. अशोक डोईफोडे, जेष्ठ प्रा. प्रफुल्ल माहुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण ला प्रारंभ करण्यात आला. लसीकरणासाठी आरोग्य अधिकारी डॉ. दीक्षा ताकसांडे, सेवाकर टोंगे, पवन ताजने, प्रणाली बावणे, ज्योत्स्ना वैद्य यांनी योगदान दिले. लसीकरण अभियान यशस्वी रीतीने राबविण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top