विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
प्रवृत्ती फाउंडेशन राजुरा द्वारे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी छावा फोउंडेशन चे अध्यक्ष आशीष करमनकर, हजरत टिपू सुलतान फाउंडेशन राजुरा चे अध्यक्ष असलम चाऊस, मराठा सेवा संघ तथा चांदगड फोर्मर प्रोड्युसर कंपनी राजुरा चे दिनेश पारखी, ओबीसी
समन्वय समिती राजुराचे अध्यक्ष उत्पल गोरे, स्वराज्य आधार फोउंडेशन राजुरा चे प्रतिक कावडे, प्रवृत्ती फोउंडेशन राजुरा तालुका अध्यक्ष सुरज भांबरे, आमचा विदर्भ न्यूज पोर्टलचे प्रतिनिधी विरेंद्र पुणेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात स्वराज्य जननी राज माता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद या महामानवांना मान वंदना देऊन करण्यात आली. आशिष करमनकर यांनी सांगितले कि मा जिजाऊंचा आदर्श व स्वामी विवेकानंद यांचे महान विचार आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करावे. विरेंद्र पुणेकर यांनी युवकांना आता नोकरी सोबतच राजकारण व व्यवसायाकडे वाढायला हवे असे सांगितले. दिनेश पारखी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, ओबीसींची जातनिहाय हातात घेऊन गावोगावी ओबीसीं लोकांत जनगणने बाबत प्रबोधन करून नवी क्रांती घडवण्याचे काम हाती घ्यावे लागेल.
आभार सुरज भांबरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रवृत्ती फोउंडेशन राजुराच्या सभासदांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.