Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला या वर्षात दोनदा पावसाने शेतकऱ्याचं केलं वाटोळं खरीप रब्बी दोन्हीही पीक बरबाद पहिल्या पावसात कापूस बरबाद आणि ...

  • अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला
  • या वर्षात दोनदा पावसाने शेतकऱ्याचं केलं वाटोळं
  • खरीप रब्बी दोन्हीही पीक बरबाद
  • पहिल्या पावसात कापूस बरबाद आणि या अवकाळी पावसात चना बरबाद
  • शेतपिके झाली भुईसपाट ; बळीराजाला मोठा आर्थिक फटका
  • तुर, हरबरा, लाखोळी व मिरची पिकाचे मोठे नुकसान
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर आज झाले सूर्यदेवाचे दर्शन झाले मात्र जिल्ह्यात दोन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिके भुईसपाट झाली आहेत. बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. उध्वस्त झालेली पिके बघून बळीराजा रडकुंडीस आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सोमवार, मंगळवार व बुधवारला अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु होती. जिल्ह्यातील काही भागात जोरदार तर मध्यम स्वरूपाचा सरी बरसल्या. या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले.
चिमुर तालुक्यातील पळसगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. तुर, हरबरा, लाखोळी या पिकांना पाऊस मारक ठरला आहे. राजुरा तालुक्यात येणाऱ्या भेंडवी परिसरात पावसामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले. मुल, सावली तालुक्यात भाजीपाला भुईसपाट झाला आहे. गोंडपिपरी तालुक्यात मजूरांची समस्या मोठी आहे, त्यामुळे आजही अनेक शेतातील कापूस वेचणी बाकी आहे. अवकाळी पावसाने कापूस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले. मायबाप सरकार मदतीचा हात पुढे करेल अशी अपेक्षा बळीराजाने ठेवली आहे.

जिल्ह्यात पिकांची स्थिती
जिल्ह्यात 1 लाख 5 हजार 424 हेक्टरची पेरणी झालेली आहे. हरबरा पिकाची एकुण पेरणी 53 हजार 864 हेक्टरमध्ये झाली आहे. ज्वारी पिकाची पेरणी 2500 हेक्टर आहे. अद्याप काही पेरणी बाकी आहे. सध्या सुरु असलेला अवकाळी हरबरा, ज्वारी, करडई पिकासाठी उपयुक्त असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top