Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सोनूर्ली येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका सलमाबी शेख सत्तार कुरेशी सन्मानित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सोनूर्ली येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका सलमाबी शेख सत्तार कुरेशी सन्मानित जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा या अभि...

  • सोनूर्ली येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका सलमाबी शेख सत्तार कुरेशी सन्मानित
  • जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा या अभियानांतर्गत गौरव
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
सोनूर्ली येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा या अभियान अंतर्गत महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्ली येथील उपक्रमशील शिक्षिका सलमाबी शेख सत्तार कुरेशी यांनी विविध उपक्रम मध्ये भाग घेऊन शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कार्य केल्याबद्दल बाल संस्कार समूह महाराष्ट्र राज्य च्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहेत.
शिक्षिका सलमाबी कुरेशी यांना गौरविण्यात आल्याबद्दल गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार सुभाषभाऊ धोटे, प्रभारी सचिव धनंजय गोरे व इतर संचालक तसेच महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्ली चे मुख्याध्यापक शरद जोगी व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top