Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 11,000 फूट उंचीवर फुटबॉल स्टेडियम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
11,000 फूट उंचीवर फुटबॉल स्टेडियम लेहमध्ये दुर्गम भागात 'खेलो इंडिया खेलो' आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स शिमला - नैसर्गिक सौंदर्यान...

  • 11,000 फूट उंचीवर फुटबॉल स्टेडियम
  • लेहमध्ये दुर्गम भागात 'खेलो इंडिया खेलो'
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
शिमला -
नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट स्टेडियमपैकी एक स्टेडियम तर आहेच शिवाय आता एक फुटबॉल स्टेडियमचाही या यादीत समावेश झाला आहे, जो केंद्रशासित लडाखमधील लेहमध्ये स्थापित करण्यात आले आहे. पर्वतरांगेत तयार करण्यात आलेले हे अतिशय सुंदर असे स्टेडियम लेहमधील स्पितुकमध्ये आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी लेहमधील स्पितुकमध्ये तयार करण्यात आलेल्या या सुंदर फुटबॉल स्टेडियमचे हवाई दृश्य शेअर केले. हे फुटबॉल स्टेडियम समुद्र सपाटीपासून 11000 फूट उंचीवर तयार करण्यात आले आहे.

पायाभूत सुविधा
अनुराग ठाकूर यांनी या स्टेडियमचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले. त्यात त्यांनी भारतात मैदानी खेळांसाठी पायाभूत सुविधा कशा तयार केल्या जात आहे आणि ते कसे सर्वोच्च स्तरावर पोहोचवले जात आहे याचा उल्लेख केला आहे. स्टेडियमचे मनमोहक दृश्य पाहून अनेकांना आश्चर्यही वाटले. सरकारने खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत लोकांना विविध क्रीडा प्रकारांच्या सुविधा विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्याच उद्देशातून अतिशय दुर्गम अशा भागात हे स्टेडियम तयार करण्यात आले आहे.

लडाखच्या नागरिकांची स्वानपूर्ती
हे स्टेडियम आता तयार झाले असून लवकरच खेळाडूंसाठी खुले करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजुजू यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राज्यात फुटबॉलसाठी सिंथेटिक ट्रॅक आणि एस्ट्रोटर्फसह विविध क्रीडा सुविधांसाठी पायाभरणी केली होती. स्पितुक येथील नागरिक आणि हौशी फुटबॉल खेळाडू होण्याची लालसा असलेल्या मुलांसाठी हे स्टेडियम स्वप्नपूर्ती करणारेच आहे. स्थानिक जनतेसाठी हे स्टेडियम खुले झाल्यास आणि आणि फुटबॉल सामन्यांची मेजवानी सुरू झाल्यानंतर लडाखमध्ये त्यांच्या स्वप्नांना पंख फुटणार हे निश्चित.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top