Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राष्ट्रसंत तुकडोजी व गाडगे महाराजांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी - नंदकिशोर वाढई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रसंत तुकडोजी व गाडगे महाराजांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी - नंदकिशोर वाढई निंबाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी व गाडगे महाराज पुण्यतिथीच...

  • राष्ट्रसंत तुकडोजी व गाडगे महाराजांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी - नंदकिशोर वाढई
  • निंबाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी व गाडगे महाराज पुण्यतिथीचे आयोजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ निंबाळा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 वी सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळा व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची 65 वी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन कळमनाचे सरपंच, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर सुभाष वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नंदकिशोर वाढई यांनी गावातील प्रत्येक मायबाप जनतेने आपल्या मुलांना व स्वतः वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सामुदायिक प्रार्थना नित्यनेमाने करण्याचे आवाहन केले. या सामुदायिक प्रार्थनेतून निश्चितच तुमच्या कुटुंबामध्ये, पर्यायाने गावामध्ये चांगला माणूस घडल्याशिवाय राहणार नाही एवढी मानवतेची शिकवण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सामुदायिक प्रार्थने मध्ये सांगितलेली आहे तर गाडगेबाबा च्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण विषयक विचारांचा स्विकार सर्वांनी करावा असे सांगितले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे अँड. राजेंद्र जेणेकर, प्रमुख पाहुणे प्रचार प्रमुख लटारी मत्ते, ग्रामगीता परीक्षा प्रमुख मोहनदास मेश्राम, संघटन प्रमुख झहीर खान, संघटक सुभाष पावडे, निंबाळाचे पोलीस पाटील गोपाल पाल, ग्राप सदस्य दीपक झाडे, प्रियंका गेडाम, तमुस अध्यक्ष महादेव ताजने, विठ्ठलराव पाल, दत्ता पिंपळशेंडे, भिवसन पाटील मोडघरे, भास्कर पिंपळकर, विजय गेडाम, प्रभाकर पाल, दिवाकर पाटील मोडघरे, नीलकंठ शामराव घाटे, गजानन महादेव बोरकर, अमोल उरकुडे यासह निंबाळा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top