Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - आमदार ...

  • आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
  • जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोरपना तालुक्यात आज दि. 23/01/22 ला विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत पारडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 चे विस्तारीकरण व पशुवैद्यकीय कर्मचारी निवासस्थानांची बांधकाम करणे, किंमत ९८ लक्ष, पारडी अप्रोज रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, किंमत ४३ लक्ष, कोडासी (बु), शेरज (बु), लोणी आसन  ते नांदाफाटा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किंमत ५० लक्ष, कोळशी खुर्द पिपरी ते राज्यमार्ग मातीकाम व खडीकरण करणे किंमत ५० लक्ष रुपये निधी च्या विकासकामांचे भूमिपूजन तसेच ग्रामपंचायत शेरज आणि मौजा गांधिनगर येथे जलशुद्धीकरण (RO) यंत्रणेचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.    
या प्रसंगी कोरपना कृ.उ.बा.स सभापती श्रीधरराव गोडे, कोरपना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, सभापती रुपाली तोडासे, जि. प. सदस्य कल्पना पेचे, विना मालेकर, उपसभापती सिंधु आस्वले, माजी सभापती श्याम रणदिवे, संभाजी कोवे, माजी जि प सदस्य उत्तमराव पेचे, जेष्ठ नेते सुरेश मालेकर, गणेश गोडे, रोशन आस्वले यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top