Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोर्धा येथे जिल्हा निधीतून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोर्धा येथे जिल्हा निधीतून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न  ग्रामवासियांनी मानले जिपसदस्य संजय गजपुरे यांचे आभार आमचा विदर्भ - ब्युरो रिप...

  • कोर्धा येथे जिल्हा निधीतून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न 
  • ग्रामवासियांनी मानले जिपसदस्य संजय गजपुरे यांचे आभार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागभीड -
नागभीड तालुक्यातील पारडी-मिंडाळा-बाळापुर जिप क्षेत्रातील ग्रापं कोर्धा येथील नविन वस्तीतील प्रकाश चिताडे ते महेश मेश्राम यांच्या घरांपर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमीपुजन जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी वस्तीतील नागरिकांनी ग्रापं मार्फत जिप सदस्य संजय गजपुरे यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती.
चंद्रपुर जिप अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांनी याची दखल घेत जिल्हा निधीतून या रस्त्यासाठी १० लक्ष रुपयांची तरतुद करुन दिल्याने संजय गजपुरे यांनी सौ. संध्याताई गुरनुले यांचे आभार मानले आहे. कोर्धा येथे आतापर्यंत नवीन आंगणवाडी बांधकाम, शाळा दुरुस्ती, जिप शाळेसाठी विज्ञान वर्गखोली, खनिज निधीतून सिमेंट रस्ते, नवीन बंधारा, शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीडी वर्क बांधकाम, यासोबतच इतर कामांच्या माध्यमातुन गावाच्या विकासासाठी संजय गजपुरे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिला आहे. ग्रामवासियांना दिलेला शब्द पुर्ण करणाऱ्या विकासाभिमुख जिप सदस्य संजय गजपुरे यांचेही यावेळी ग्रामस्थांनी आभार मानले. 
याप्रसंगी कोर्धा ग्राम पंचायत सरपंच सौ. पुष्पाताई चौधरी, उपसरपंच दिनेशभाऊ चौधरी, ग्रामसेवक नाकतोडे साहेब, ग्रापं सदस्य हरिदास नवघडे, ग्रा पं सदस्य विलासजी चौधरी, ग्रापं सदस्या सौ. रेखाताई चौधरी, ग्रापं सदस्या सौ. अपर्णाताई मेश्राम, रोजगार सेवक यशवंतजी निकूरे, सामाजिक कार्यकर्ते विजयजी खोब्रागडे, युवा नेते शंकर मशाखेत्री, विनोद खेवले, रमेश पानसे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top