Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अवैधरित्या गोवंशाची तस्करी करताना आठ जनावरे व पिकअप सह दोन आरोपींना घेतले ताब्यात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अवैधरित्या गोवंशाची तस्करी करताना आठ जनावरे व पिकअप सह दोन आरोपींना घेतले ताब्यात लाठी पोलिसांची कारवाई अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनि...

  • अवैधरित्या गोवंशाची तस्करी करताना आठ जनावरे व पिकअप सह दोन आरोपींना घेतले ताब्यात
  • लाठी पोलिसांची कारवाई
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
विरुर स्टेशन -
गोंडपिपरी तालुक्यातील दरूर ते पोडसा मार्गे तेलंगणात गोवंशाची तस्करी करणारे पिकअप वाहन व त्यातील आठ जनावर सह दोन आरोपींना लाठी पोलिसांनी वर्धा नदी काठावर ताब्यात घेतले असून प्रकरणातील दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
गोंडपिपरी तालुक्यातील दरूर ते पोडसा मार्गे जनावरांची अवैधरित्या तस्करी होत असल्याचे माहितीवरून लाठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार फाल्गुन घोडमारे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रभू पुराम, शिपाई शंकर, सुनील राऊत, भोयर, जितू चव्हाण हे पोडसा जवळील वर्धा नदी काठावर पाडत ठेऊन होते दरम्यान दरूर कडून येणाऱ्या पिकअप वाहनाला थांबवून झडती घेतली असता कोणतेही कायदेशीर परवानगी नसतानाही निर्दयीपणे पिकअप मध्ये आठ गोवंश ची तस्करी करीत असल्याचे उघडकीस आले यावरून MH-34 BG-6289 क्रमांकाचे पिकअप वाहनासह आठ गोवंश जनावर व वाहनातील कृष्णा उर्फ राजा बसिराम पवार राहणार थोमापूर, रमेश तिरुपती कुंदाराम राहणार कोष्टाला तालुका राजुरा यांना अटक करण्यात आली. प्राण्यास निर्दयपणे कोंबून तस्करी करणे प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमान्वे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनात लाठीचे ठाणेदार फाल्गुन घोडमारे करीत आहेत. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top