Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मृतक कामगाराच्या परिवाराला साडेसात लाख रुपयाची आर्थिक मदत तोंडाला पाने पुसल्या सारखीच - विजय ठाकरे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मृतक कामगाराच्या परिवाराला साडेसात लाख रुपयाची आर्थिक मदत तोंडाला पाने पुसल्या सारखीच - विजय ठाकरे  अल्ट्राटेक आणि अंबुजा सिमेंट कंपनीने पीड...
  • मृतक कामगाराच्या परिवाराला साडेसात लाख रुपयाची आर्थिक मदत तोंडाला पाने पुसल्या सारखीच - विजय ठाकरे 
  • अल्ट्राटेक आणि अंबुजा सिमेंट कंपनीने पीडित परिवाराला दिली होती 15 लाख रुपये कुटुंबातील एका व्यक्तीस नौकरी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर येथील अल्ट्राटेक सीमेंट कंपनीत काल झालेल्या कंत्राटी कामगाराच्या मृत्युनंतर कंपनी प्रशासनाने पीडित परिवाराला स्थानीय कामगार, सामाजिक संघटना व इतर राजकीय पक्षांच्या 10 तासाच्या दवाबानंतर शेवटी साडेसात लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. ही आर्थिक मदत खूप कमी असून मृत्यु प्राप्त झालेल्या कामगार परिवाराचे तोंडाला पाने पुसल्या सारखे आहे. लवकरच ठेका श्रमिकांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी विजयक्रान्ति कामगार संघाचे नेतृत्व उपलब्ध करून देऊ असा विश्वास विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या 6 महिन्यात गडचांदुर परिसरात असलेल्या अल्ट्राटेक सीमेंट आवारपुर आणि अंबुजा सीमेंट उपरवाही येथे कामगाराचे नैसर्गिक मूत्युच्या दोन घटना घडल्या. या दोन्ही पीड़ित परिवारास 15 लाख रुपये व कुटुंबातील एका व्यक्तिस नोकरी देण्यात आली परंतु मानिकगढ़ सीमेंट, गडचांदुर (आता अल्ट्राटेक) येथे मजूरांची मजबूत संघटना नसल्याने तिथे कामगारांना न्याय मिळत नाही. कारण इथे व्यवस्थापनाचे प्रतिनिधि आणि कंपनी यूनियन चे पदाधिकारी दोन्ही परप्रांतिय आहेत. त्यांना स्थानीय अथवा प्रकल्पग्रस्त कामगाराशी मुळीच आपुलकी नाही. म्हणून आपले कामगार नेते तरी किमान स्थानीय असणे खूप महत्त्वाचे असते. सध्याचे कामगार युनियन चे पदाधिकारी कंपनी व्यवस्थापनाचे पोपट असल्याने कामबंद आंदोलन करून न्याय मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे कंपनीत असलेली कामगार युनियन कंत्राटी कामगारांच्या मुद्द्यावर गप राहते. कंपनी प्रशासन तूटपूंजी मदत करून पीड़ित परिवाराच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. येथे विजयक्रान्ति सारखी ठेका श्रमिकांनची संघटना असती तर 101% निर्णायक समझौता झाला असता. काल पवार कुटुंबाला दिलेली साडेसात लाख रूपयाची मदत ही विजयक्रान्ति ला अमान्य आहे. त्या मृतक कामगाराच्या परिवाराला कमीत कमी जवळपास असलेल्या कंपनीत दिलेल्या आर्थिक मदत राशी एवढी म्हणजे 15 लाख रुपये राशी द्यायला हवे होत. भविष्यात लवकरच मानिकगढ़ सीमेंटच्या ठेका श्रमिकांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी विजयक्रान्ति कामगार संघाचे नेतृत्व उपलब्ध करून देऊ असा विश्वास विजयक्रान्ति कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे यांनी दिला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top