Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 563 कोरोनामुक्त तर 438 नवे बाधित ; 1 मृत्यु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
563 कोरोनामुक्त तर 438 नवे बाधित ; 1 मृत्यु ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 3876 खबरदारी घेण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा आजचे कोरोना अपडेट शशी ठक्क...
  • 563 कोरोनामुक्त तर 438 नवे बाधित ; 1 मृत्यु
  • ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 3876
  • खबरदारी घेण्याचे आवाहन
  • चंद्रपूर जिल्हा आजचे कोरोना अपडेट
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दि.27 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असुन गत 24 तासात जिल्ह्यात 563 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 438 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर गुरुवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 167, चंद्रपूर 49, बल्लारपूर 17, भद्रावती 25, ब्रह्मपुरी 23, नागभीड 20, सिंदेवाही 4, मुल 14, सावली 15, पोंभूर्णा 3,गोंडपिपरी 26, राजुरा 9,चिमूर 6, वरोरा 47, कोरपना 11, तर जिवती येथे 2 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.आज मृत झालेल्यामध्ये ब्रम्हपूरी येथील एका पुरुषाचा समावेश आहे.
जिल्हात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 96 हजार 321 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 90 हजार 896 झाली आहे. सध्या 3876 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 39 हजार 320 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 41 हजार 819 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्हात आतापर्यंत 1549 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वतःची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top