Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 27 आणि 28 जनेवारीला निःशुल्क रोगनिदान व औषध वाटप शिबीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
27 आणि 28 जनेवारीला निःशुल्क रोगनिदान व औषध वाटप शिबीर शिबिरात बीपी, शुगर तपासणी व इतर विविध रोगांवर तपासणी नागरिकांना शिबिराचे लाभ घेण्याचे...
  • 27 आणि 28 जनेवारीला निःशुल्क रोगनिदान व औषध वाटप शिबीर
  • शिबिरात बीपी, शुगर तपासणी व इतर विविध रोगांवर तपासणी
  • नागरिकांना शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी यांच्या वतीने येत्या 27 आणि 28 जनेवारीला निःशुल्क रोगनिदान व औषध वाटप शिबीर क्राईस्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर यांच्या सौजन्याने आयोजित केला आहे.
दिनांक 27 जानेवारी, गुरुवारला ग्रामपंचायत बिबी परिसर आणि जिल्हा परिषद शाळा, धामणगाव येथे सकाळी 11.00 ते 3.00 वाजेपर्यंत राहील. तसेच दिनांक 28 जानेवारी, शुक्रवारला जिल्हा परिषद शाळा, नैतामगुडा आणि जिल्हा परिषद शाळा, आसन (बु.) येथे सकाळी 11.00 ते 3.00 वाजेपर्यंत मोफत शिबिर घेण्यात येईल. शिबिरात बीपी, शुगर तपासणी करण्यात येईल. तसेच इतर विविध रोगांवर तपासणी करण्यात येणार असून रुग्णांना बिमारीनुसार मोफत औषधी देण्यात येईल. या शिबिरात कोणतीच वयोमर्यादा नसून लहान-मोठ्या प्रत्येक रुग्णांची तपासणी करण्यात येईल. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन रुग्णांनी मास्क लावून यावे व सामाजिक अंतर पाळून नागरिकांनी या मोफत रोग निदान व औषध वाटप शिबिराचे लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top