- जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी येथे मासीक पाळी व्यवस्थापन उद्बोधन कार्यक्रम
- "सन्मान महाराष्ट्राचा लेकींचा" अभियानांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी "मासिक पाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्र संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी पंचायत समिती कोरपना येथे जिजाऊ ते सावित्री "सन्मान महाराष्ट्राचा लेकींचा" या अभियानांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी "मासिक पाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्र 4 जानेवारी ला आयोजित करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पेंदोर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सविता बोबडे, जेनेकर, तालुका प्रवर्तक कोरपना (सुपरवायझर आशा वर्कर), उज्ज्वला मून (आशा वर्कर बाखर्डी) तसेच सहायक शिक्षिका सुप्रिया कोंगरे उपस्थित होत्या.
किशोरवयीन मुलींना वरील विषयाबद्दल उत्कृष्ठ मार्गदर्शन केले व त्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले नंतर मुख्याध्यापक पेंदोर यांनी शाळेच्या वतीने भेट प्रदान करून सविता बोबडे, जेनेकर व उज्ज्वला मून यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक स्वतंत्रकुमार शुक्ला यांनी तर आभार प्रदर्शन सहायक शिक्षक प्रफुल्ल जीवने यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.