Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपनात भाजपाची बैठक संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपनात भाजपाची बैठक संपन्न धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन क...

  • कोरपनात भाजपाची बैठक संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्ष खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक तथा प्रदेश सदस्य प्रामुख्याने उपस्थिहोते. प्रमुख उपस्थिती नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, सतीश उपलेंचवार शहराध्यक्ष गडचांदुर, राजू घरोटे जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष, किशोर बावणे सहकार आघाडी प्रमुख, अमोल आसेकर माजी नगरसेवक, वसंतराव बहिरे आदि उपस्थित होते. बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक खुशाल बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांनी नगरपंचायत निवडणुक विषयी सविस्तर चर्चा केली. बैठकीला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top